scorecardresearch

शाहरुखचे तीन चित्रपट अन् कडक सॅल्युट; चाहत्याने फोटो शेअर करताच अभिनेता भावूक, म्हणाला, “मागच्या अनेक वर्षांत…”

शाहरुख खानने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ सेशन घेतलं. यावेळी त्याने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

शाहरुखचे तीन चित्रपट अन् कडक सॅल्युट; चाहत्याने फोटो शेअर करताच अभिनेता भावूक, म्हणाला, “मागच्या अनेक वर्षांत…”
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादात सापडलेल्या ‘पठाण’चा धमाकेदार ट्रेलर १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. शाहरुखचे चाहते आता अॅक्शन व देशभक्तीने भरपूर असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी उत्सुक आहेत.

शाहरुख खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. गुरुवारी त्याने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ सेशन घेतलं. यावेळी त्याने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. त्यातच एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या ‘पठाण’ चित्रपटातील एक फोटो आणि त्याबरोबरच त्याच्या ‘फौजी’ आणि ‘कल हो ना हो’ चित्रपटातील सॅल्युटचा एक फोटो कोलाज करत तुझ्या प्रवासासाठी एक शब्द कोणता असेल असं विचारलं होतं. त्यावर शाहरुखने “अरे व्वा! हे मी मागच्या अनेक वर्षांत पाहिलं नव्हतं. सॅल्युट करताना नेहमीचा भावनिक क्षण!” असं उत्तर दिलं.


दरम्यान, अॅक्शनपट असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचं बजेट २५० कोटी असल्याचं म्हटलं जातंय. तसेच या चित्रपटासाठी शाहरुख खानने मानधन म्हणून मोठी रक्कम आकारल्याची चर्चा आहे. चित्रपटावरून वाद सुरू असताना तो देशभक्तीपर आहे, त्यामुळे चाहते उत्सुक आहेत. अशातच स्वतःचेच सॅल्युट करतानाचा फोटो पाहून शाहरुख भावूक झाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 07:44 IST

संबंधित बातम्या