scorecardresearch

Pathaan Controversy दरम्यान शाहरुख खानची पहिली पोस्ट; चाहत्यांना आवाहन करत म्हणाला, “१८ डिसेंबरला…”

या वादामुळे ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे

srks first social media post after besharam rang controversy
(फोटो : व्हिडिओमधून स्क्रीनशॉट)

सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आणि त्यातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बेशरम रंग’ हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच वाद रंगला आहे. या वादामुळे ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. वेगवेगळ्या स्तरातून आता या वादावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

नुकतंच अभिनेत्री पायल रोहतगीने याबद्दल वक्तव्य करत दीपिकाची बाजू घेतली आहे शिवाय हा वाद पूर्णपणे बिनबुडाचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. शाहरुख खानसुद्धा त्याच्या ‘पठाण’चं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. शाहरुखने नुकतीच एक पोस्ट शेअर करत चित्रपटप्रेमी आणि फुटबॉल प्रेमी यांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे.

आणखी वाचा : ‘Saffron’ bikini Controversy : “हा निव्वळ मूर्खपणा…”; दीपिकाची बाजू घेत अभिनेत्री ‘बॉयकॉट पठाण’ म्हणणाऱ्यांवर संतापली

खुद्द शाहरुखने सगळ्यांना त्यांच्याबरोबर फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना बघायचं निमंत्रण दिलं आहे. ‘पठाण’बरोबर हा सामना बघा असं म्हणत शाहरुखने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘जिओ सिनेमा’ आणि ‘स्पोर्ट्स १८’ च्या स्टुडिओमध्ये येत्या १८ डिसेंबरला शाहरुख स्वतः हा अंतिम सामना पाहायला हजर राहणार आहे. या निमित्ताने त्याने त्याच्या चित्रपटाचं प्रमोशनही केलं आहे आणि क्रीडाप्रेमी मंडळींनाही त्याने या चित्रपटाशी जोडलं आहे. इतकंच नाही तर प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू वेन रूनी याच्याकडूनही शाहरुखने त्याचा ‘पठाण’चा खास डायलॉग वदवून घेतला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ‘बेशरम रंग’ ते हिंदू महासभेचा आक्षेप; ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

‘पठाण’ हा चित्रपट तसा आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या नवीन गाण्यामुळे हा वाद आणखी वाढू शकतो अशी शक्यता आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 14:13 IST

संबंधित बातम्या