घराबाहेर जमलेल्या असंख्य चाहत्यांना मिळाली 'पठाण'ची झलक; फ्लाइंग कीस देत किंग खानने केलं त्यांना खुश | shahrukh khan greets fans outside mannat after pathaan release | Loksatta

घराबाहेर जमलेल्या असंख्य चाहत्यांना मिळाली ‘पठाण’ची झलक; फ्लाइंग कीस देत किंग खानने केलं त्यांना खुश

किंग खानची एक झलक मिळवण्यासाठी त्याच्या घराबाहेर लोकांची झुंबड उडाली होती

shahrukh khan mannat
फोटो : सोशल मीडिया

२५ जानेवारी या दिवशी ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटातून किंग खान शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर हजेरी लावली. शाहरुखच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.

शिवाय या चित्रपटाचं प्रमोशन करताना शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून त्याच्या चाहत्यांशी थेट संवाद साधला होता, आता नुकतंच त्याने ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रथमच त्याच्या चाहत्यांना दर्शन दिलं आहे. रविवारी शाहरुख खानने नेहमीप्रमाणे त्याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं.

आणखी वाचा : शाहरुख खान अखेर मौन सोडणार; ‘पठाण’च्या घवघवीत यशानिमित्त कलाकार प्रथमच मीडियाशी साधणार संवाद

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काळे कपडे आणि डोक्यावर काळा बंडाना बांधून शाहरुख त्याच्या चाहत्यांना भेटायला आला. नेहमीप्रमाणेच त्याची एक झलक मिळवण्यासाठी त्याच्या घराबाहेर लोकांची झुंबड उडाली होती. ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतरच प्रथमच शाहरुख जनतेसमोर आला आणि लोकांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

इतकंच नाही तर गेले काही दिवस मीडियापासून लांब राहणारा शाहरुख आणि ‘पठाण’मधील इतर कलाकार म्हणजेच दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम हे आज मीडियाशी संवाद साधणार असल्याचं कालच स्पष्ट झालं होतं. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसुद्धा उपस्थित असणार आहे. ‘पठाण’ने २०० कोटीचा टप्पा पार केला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 09:29 IST
Next Story
Pathaan Box Office Collection: पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच बोलबाला; कमावले ‘इतके’ कोटी