शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी ‘पठाण’ हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटातून शाहरुख खान जवळजवळ चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने त्याचे चाहते चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटासाठी फार उत्सुक होते. शाहरुख आणि दीपिकाही ह्या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत जे उत्कंठा शिगेला पोहोचवत होते. पण आता या चित्रपटासाठी त्यांनी किती मानधन घेतलं आहे हा आकडा समोर आला आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘पठाण’ ह्या चित्रपटाचं चित्रीकरण गेले बरेच महिने सुरू होतं. या चित्रपटासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी खूप मेहनत घेतली आहे. या मेहनतीसाठी त्यांना मानधनाच्या स्वरूपात चांगलंच मोठं फळ मिळालं आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…

आणखी वाचा : “सलमान आणि शाहरुख दोघेही…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव

निर्माता आदित्य चोप्राने ‘पठाण’च्या बजेटवर पैसे खर्च करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी शाहरुख खान ने तब्बल १०० कोटी रुपये मानधन आकारलं आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाला होणाऱ्या नफ्यातही त्याने हिस्सा मागितला आहे. तर दीपिका पादुकोणने या चित्रपटासाठी १५ ते ३० कोटींच्या मध्ये फी घेतली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत असलेला अभिनेता जॉन अब्राहम याने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन आकारल्याचं समोर आलं आहे. या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये फी घेतल्यामुळे शाहरुख खान सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या सहामध्ये सामील झाला आहे.

हेही वाचा : आता शाहरुख- दीपिकच्या ‘पठाण’लाही बसणार बहिष्काराचा फटका? ‘या’ कारणामुळे प्रेक्षक संतप्त

दरम्यान या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव आहे ‘बेशरम रंग.’ पण या गाण्यावर केलेले हे चित्रण नेटकऱ्यांना आवडलेलं नाही आणि सोशल मीडियावर त्यांनी या गाण्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे. ‘पठाण’ चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.