सलमान खानच्या 'टायगर ३'मध्ये शाहरुख करणार कॅमिओ? हिंट देत भाईजान म्हणाला... | Shahrukh khan may do a cameo in salman khan tiger 3 film | Loksatta

सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये शाहरुख करणार कॅमिओ? हिंट देत भाईजान म्हणाला…

‘पठाण’मध्ये सलमानचा कॅमिओ असणं हा सर्वांसाठीच आश्चर्याचा सुखद धक्का होता.

salman shahrukh

२०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ हा कालच सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाला शाहरुखचे चाहते चित्रपटगृहात तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्याच्या चित्रपटात सलमान खान दिसणं हे चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज होतं. आता सलमान खानच्या ‘पठाण’मधील कॅमिओनंतर शाहरुख खान सलमानच्या ‘टायगर ३’मध्ये दिसणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान व शाहरुख रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र आले आहेत. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा चित्रपटामध्ये पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. पण या चित्रपटात सलमानचा कॅमिओ असणं हा सर्वांसाठीच आश्चर्याचा सुखद धक्का होता. या चित्रपटामध्ये सलमान खानला पाहून त्याचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. त्या दोघांना एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे. पण अशातच हीच जोडी पुन्हा एकदा एका चित्रपटात एका सीनमध्ये एकत्र दिसणार आहे अशी हिंट खुद्द सलमान खाननेच दिली आहे.

आणखी वाचा : चित्रपटगृहात सुपरहिट पण IMDB वर निघाली ‘पठाण’ची हवा, ‘इतक्या’ प्रेक्षकांनी दिलं १० पैकी १ रेटिंग

सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. याच चित्रपटात शाहरुखही कॅमिओ करू शकतो असा इशारा सलमान खानने चित्रपटातच दिला. ‘पठाण’ या चित्रपटात सलमानच्या तोंडी एक डायलॉग आहे. यात सलमान म्हणतो, “मी एका मोठ्या मिशनवर जात आहे. तेव्हा टायगरला पठाणची गरज भासू शकते. तू जिवंत असशील ना?” तर यावर पठाण देखील त्याला त्याच्या मिशनमध्ये मदत करण्याचं वचन देतो. त्यामुळे सलमान खानचा ‘टायगर ३’मध्ये शाहरुख खानदेखील एका छोट्याशा भूमिकेत दिसेल अंदाज त्यांचे चाहते बांधत आहेत.

हेही वाचा : “तुझी बदनामी करण्यात आली पण…” करण जोहरने ‘पठाण’साठी केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान सध्या ‘पठाण’ चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत. तसंच हा वाढता प्रतिसाद बघून या चित्रपटाचे अनेक शो वाढवण्यात आले आहेत. तसंच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने देशभरातून ५० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:34 IST
Next Story
‘पठाण’ला विरोध करणाऱ्यांना रिचा चड्ढाने लगावला टोला; पोस्ट शेअर करत म्हणाली….