दीपिकाचा हॉट बिकिनीमधील फोटो शेअर करत शाहरुख खानने दिली 'पठाण'बद्दल मोठी अपडेट; चाहते म्हणाले... | shahrukh khan new update about pathaan movie shares hot look of deepika padukone | Loksatta

दीपिकाचा हॉट बिकिनीमधील फोटो शेअर करत शाहरुख खानने दिली ‘पठाण’बद्दल मोठी अपडेट; चाहते म्हणाले…

शाहरुख आणि दीपिका यांच्यातील हॉट केमिस्ट्री पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत

दीपिकाचा हॉट बिकिनीमधील फोटो शेअर करत शाहरुख खानने दिली ‘पठाण’बद्दल मोठी अपडेट; चाहते म्हणाले…
शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण (फोटो : सोशल मीडिया)

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातील त्याचा लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तो लूक सर्वांच्याच पसंतीस पडला. शिवाय या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

नुकतेच शाहरुखने त्याच्या या चित्रपटातील खास लूकचे फोटो शेअर केले होते. पाठोपाठ आता त्याने या चित्रपटातील दीपिकाच्या लूकचा फोटो आणि पहिल्या गाण्याची घोषणा करणारी एक पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये दीपिका पदूकोण पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये मादक अवतारात दिसत आहे. दीपिकाचा हा बोल्ड अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे.

आणखी वाचा : पतीने दिली होती चाकूने जीवे मारायची धमकी; बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेले गंभीर आरोप

दीपिकाचा हा हॉट लूक शेअर करत शाहरुखने त्यांच्या चित्रपटातील आगामी गाण्याची झलक दिली आहे. ‘बेशरम रंग’ हे त्या गाण्याचं नाव असून १२ जानेवारीला हे गाणं प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर शाहरुखने केलेली पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या लूकची मागणी गेली आहे. “दीपिकापेक्षा आम्हाला शाहरुखचा अंदाज पाहायचा आहे” असंही कित्येक फॅन्सनी कॉमेंटमध्ये लिहिलं आहे.

शाहरुखच्या ‘पठाण’ची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवाय यातील शाहरुख आणि दीपिका यांच्यातील हॉट केमिस्ट्री पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. शाहरुख खान, दीपिका पदूकोणबरोबरच जॉन अब्राहमदेखील यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण २५ जानेवारी २०२३ या दिवशी चित्रपटगृहात धडकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 13:49 IST
Next Story
पतीने दिली होती चाकूने जीवे मारायची धमकी; बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेले गंभीर आरोप