scorecardresearch

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले ५२ कोटी?

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली.

pathaan box office collection
पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल ५२ कोटी रुपये

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५२.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५२.५ कोटी रुपये कमावले आहेत. पण अद्याप अंतिम आकडे आले नसल्याने हा आकडा जास्त असू शकतो, असं म्हटलं जातंय.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार, हा चित्रपट आज सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाला असता तर हा आकडा आणखी मोठा असता. पहिल्या तीन दिवसांतच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तरण आदर्श यांच्या मते, पहिल्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत चित्रपटाने ९.४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. ‘पठाण’ने INOX वर ७.०५ कोटी रुपये, Cinepolis वर ३.९० कोटी रुपये कमवले होते. या चित्रपटाने अर्ध्या दिवसात २०.३५ कोटींचा व्यवसाय केला होता आणि दिवसअखेर या चित्रपटाचे कलेक्शन ५२.५ कोटींवर गेले आहे.

२४० कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘पठाण’! शाहरुखने १०० नव्हे तर घेतले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या दीपिका-जॉनला किती मानधन मिळालं?

‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. आज प्रजासत्ताक दिन सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे चित्रपट आजही दमदार कमाई करेल, असा चित्रपट तज्ज्ञांचा अंदाज आहे. चित्रपटाच्या कमाईचा अधिकृत अंतिम आकडा आल्यानंतरच त्याच्या कमाईबद्दल कळू शकेल. पण, काही रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी ५२.५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

“असे चित्रपट…”, शाहरुख खानच्या ‘पठाण’वर कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, करोनानंतरच्या काळात पहिल्याच दिवशी इतकी मोठी कमाई करणारा ‘पठाण’ हा पहिला चित्रपट बनला आहे. शाहरुख खानने पहिल्यांदाच त्याच्या करिअरमध्ये असा अॅक्शन चित्रपट केला आहे. गेली चार वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या शाहरुखला बघण्यासाठी चाहते तुफान गर्दी करत आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 13:01 IST
ताज्या बातम्या