"पठाणमधील काकाही..." ५ वर्षाच्या चिमुरडीचे प्रेम पाहून शाहरुख भारावला, कमेंट चर्चेत | shahrukh khan pathaan movie superhit 5 year child love the actor look SRK commented nrp 97 | Loksatta

“पठाणमधील काकाही…” ५ वर्षाच्या चिमुरडीचे प्रेम पाहून शाहरुख खान भारावला, कमेंट चर्चेत

चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत.

pathan-4

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा शाहरुख हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. तसेच प्रदर्शनाच्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचताना दिसत आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटाचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच शाहरुखने एका ५ वर्षाच्या मुलीबद्दल कमेंट केली आहे.

शाहरुखच्या पठाण चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. गेल्या २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होताच किंग खानच्या चाहत्यांनी देशभरात जल्लोष साजरा केला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत.
आणखी वाचा : ‘पठाण’चे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन पाहिल्यावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

या निमित्ताने शाहरुखने ASK SRK सेशनचे आयोजन केले होते. त्यावेळी अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले. यावेळी एक चाहता म्हणाला, “मला ५ वर्षाची मुलगी आहे. तिने पठाणमधील लूक पाहिल्यानंतर ती तुमची चाहती बनली आहे. शाहरुख यावर तुझ्या रिप्लायची वाट बघतोय.” त्यावर कमेंट करताना शाहरुख म्हणाला, “Aawwww! तिला माझ्याकडून एक गोड मिठी मारा आणि तिला सांगा की ‘पठाण’मधील काकाही तुझे चाहते आहेत.”

आणखी वाचा : सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या बाळाचा चेहरा का दाखवत नाहीत? जाणून घ्या कारणं

दरम्यान जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे. ‘दंगल’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ सारख्या चित्रपटांप्रमाणेच ‘पठाण’ही कमाई करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:56 IST
Next Story
सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या बाळाचा चेहरा का दाखवत नाहीत? जाणून घ्या कारणं