"कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता..." मी ५७ वर्षांचा आहे म्हणत शाहरुख खानचा खुलासा | shahrukh khan says nobody was taking me in action films he want to do such movies for next 10 years see details | Loksatta

“कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता…” मी ५७ वर्षांचा आहे म्हणत शाहरुख खानचा खुलासा

शाहरुख खानने अ‍ॅक्शनपटात काम करण्याबाबत एक खंत व्यक्त केली.

“कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता…” मी ५७ वर्षांचा आहे म्हणत शाहरुख खानचा खुलासा
शाहरुख खानने अ‍ॅक्शनपटात काम करण्याबाबत एक खंत व्यक्त केली.

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी शाहरुखने शरीरयष्टी घेतलेली मेहनतही कौतुकास्पद आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना ‘पठाण’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये शाहरुख सध्या व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने शाहरुखने एक खंत व्यक्त केली.

आणखी वाचा – आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट, आता अपूर्वा नेमळेकरला करायचंय स्वयंवर, म्हणाली…

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख म्हणाला, “मी कधीच अ‍ॅक्शनपटात काम केलं नाही. सुंदर प्रेमकथेवर आधारित चित्रपट, सामाजिक विषयावर आधारित चित्रपट मी केले. नकारात्मक भूमिका मी रुपेरी पडद्यावर साकारल्या. पण कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं.”

“आता मी ५७ वर्षांचा आहे. पुढील काही वर्ष मला अ‍ॅक्शनपटात काम करायचं आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’सारखे चित्रपट मला करायचे आहेत. अगदी टॉपचे अ‍ॅक्शनपट चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे.” शाहरुख पुढील दहा वर्ष तरी फक्त अ‍ॅक्शनपट चित्रपटच करणार आहे. तसेच टॉपचे अ‍ॅक्शनपट चित्रपट करण्याची इच्छाही यावेळी त्याने बोलून दाखवली.

आणखी वाचा – Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या, पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा

राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटामध्येही शाहरुख मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तयारीत सध्या शाहरुख आहे. येत्या २५ जानेवारीला शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 12:37 IST
Next Story
शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…