मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज | shahrukh khan son ready for his debuet as writer aryan khan shares through instagram post | Loksatta

मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा लेक आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज

आर्यन खानने एक फोटो पोस्ट करत याबद्दल खुलासा केला आहे

मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा लेक आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज
शाहरुख खान, आर्यन खान आणि सुहाना खान (फोटो : सोशल मीडिया)

बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर होत असते. गेली काही वर्षं याबद्दल बरंच काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर सतत या स्टारकिड्सवर टीका होताना आपण पाहतो. काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. ड्रग्स प्रकरणात अडकल्याने त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. शाहरुख खानवरही वैयक्तिक टीका होत होती. त्यानंतर आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले होते.

आता खुद्द आर्यन खानने या गोष्टीची पुष्टी केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने एक फोटो पोस्ट करत याबद्दल खुलासा केला आहे. लोकप्रिय इस्राईली वेबसीरिज ‘फौदा’चा अभिनेता आणि निर्माता लिओर राज याने आर्यनला यासाठी प्रशिक्षण दिल्याची चर्चा होत होती. आपल्याच वडिलांच्या प्रोडक्शन कंपनीच्या प्रोजेक्टमधून आर्यन खान अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक म्हणून लोकांच्या समोर येणार आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’ हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहायला मिळणार? चाहत्यांच्या प्रश्नाला खुद्द रिषभ शेट्टीने दिलं उत्तर

ही पोस्ट शेअर करत आर्यनने लिहिलं, “लिखाणाचे काम पूर्ण झाले आहे आता शूटिंगसाठी उत्सुक आहे.” आर्यन ज्या वेबसिरीजचं काम करतोय त्याचं लिखाण आणि दिग्दर्शनही तोच करणार असल्याची चर्चा आहे. आई गैरी खान हिनेदेखील या पोस्टवर कॉमेंट करत आर्यनला शुभेच्छा दिल्या. शाहरुखनेही याआधी कित्येक मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता, ‘मुंबई मिरर’शी संवाद साधताना त्याने सांगितलं होतं की “आर्यनला अभिनयात नाही तर दिग्दर्शन आणि लिखाणात रुची आहे.”

आर्यनने परदेशातून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले आहे. लवकरच एक स्टारकीड आपल्याला एका लेखकाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. शाहरुखची मुलगी सुहाना ही झोया अख्तरच्या वेबसीरिजमधून पदार्पण करणार आहे. सुहानाने अभिनयात करियर करायचं निश्चित केलं आहे. लवकरच तिची आगामी सिरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 21:32 IST
Next Story
परेश रावल यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ कलमांखाली गुन्हा दाखल