Shakti Kapoor says he was ready to quit Bollywood after Kader Khan Aruna Irani slapped him in Mawaali movie | Loksatta

‘मवाली’ चित्रपटातील ‘तो’ एक सीन अन् शक्ती कपूर यांनी बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय; आठवण सांगत म्हणाले…

अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांच्या मदतीने निर्णय बदलल्याचाही शक्ती कपूर यांचा खुलासा

‘मवाली’ चित्रपटातील ‘तो’ एक सीन अन् शक्ती कपूर यांनी बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय; आठवण सांगत म्हणाले…
(फोटो – सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्रामवरून आणि व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक आणि विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय, पण एक वेळ अशी होती, जेव्हा त्यांना आपलं करिअर संपलंय, असा विचार मनात आला होता. १९८३ मध्ये आलेल्या ‘मवाली’ चित्रपटाच्या सेटवर त्यांना कादर खान आणि अरुणा इराणी यांनी कानशिलात लगावली होती. त्यामुळे त्यांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच, ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन भागात त्यांनी या गोष्टीचा खुलासा केलाय.

‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, शक्ती कपूर यांनी पहिला कॉमेडी चित्रपट ‘सत्ते पे सत्ता’च्या यशानंतर मवालीमध्ये काम केलं होतं. मात्र चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी कादर खान यांना चित्रपट सोडायचा असल्याचे सांगितलं. या चित्रपटात जितेंद्र, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

आरोह वेलणकर विसरला स्वतःच्याच लग्नाची तारीख; म्हणाला,”लग्नानंतर दिवस…”

शक्ती कपूर म्हणाले, “जेव्हा मी चित्रपटात माझा पहिला शॉट देत होतो, तेव्हा कादर खान यांनी मला थप्पड मारली आणि मी जमिनीवर पडलो, तर दुसऱ्या शॉटमध्ये अरुणा इराणी यांनी मला थप्पड मारली आणि मी जमिनीवर पडलो, तिसर्‍यांदाही तसंच झालं. तो सीन करताना माझं करिअर संपलं, या विचाराने मी चिंतीत झालो. के. बापैय्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते आणि कादर खान देखील या चित्रपटात एक भूमिका साकारत होते. तेव्हा मी कादर खान यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘मी तुमच्या पाया पडतो, पण कृपया माझं संध्याकाळचं तिकीट बुक करा. मला या चित्रपटाचा भाग बनायचं नाही. माझं करिअर संपलं आहे आणि मी अजून लग्न केलेले नाही”, अशी आठवण त्यांनी सांगितली.

शाहरुखच्या ‘छैया छैया’ गाण्यासाठी मलायकाला नव्हती पहिली पसंती; इतक्या वर्षांनी फराह खानने उघड केले गुपित

त्यावेळी अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी मदत केल्याचं शक्ती कपूर यांनी सांगितलं. “मग या चित्रपटातील फाईट मास्टर असलेल्या वीरू देवगण यांनी मला बाजूला नेलं आणि म्हणाले, मी हा चित्रपट पाहिला आहे आणि जर तुला यात थप्पड खावी लागत असेल तर खा, पण चित्रपट सोडू नकोस. त्यांचा सल्ला खूप फायद्याचा ठरला. कारण ‘मवाली’ चित्रपट सुपरहिट झाला,” असं शक्ती कपूर यांनी सांगितलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी शक्ती कपूर यांचं विशेष कौतुक झालं होतं.

Video : राखी सावंत-आरोह वेलणकरमध्ये खडाजंगी, म्हणाला “तुझ्या बापाचं…”

यावेळी त्यांनी हिरो बनण्याच्या स्वप्नाबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, “प्रत्येकाला हिरो व्हायचं असतं आणि माझंही तेच स्वप्न होतं. मी ‘जख्मी इन्सान’ चित्रपटात हिरो होतो, पण पण दुर्दैवाने हा चित्रपट फारसा चालला नाही. जर एखादी व्यक्ती कॉमेडी करण्यात यशस्वी होत असेल तर तीही हिरोच असते आणि जर एखादा नकारात्मक व्यक्तिरेखेने प्रभाव पाडण्यात यशस्वी होत असेल तर तोही हिरोच असतो,” असं मत शक्ती कपूर यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 14:29 IST
Next Story
“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा