Vicky Kaushal Katrina Kaif Baby Boy: बॉलीवूडमधील क्यूट जोडपं विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. ७ नोव्हेंबर रोजी कतरिनाने मुलाला जन्म दिला. विकी आणि कतरिनाच्या बाळाच्या जन्मानंतर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटीही या दोघांचं अभिनंदन करत आहेत.

बाळाच्या जन्मानंतर कौशल कुटुंबाचा आनंद गगनात मावत नाहीये. “मी काका झालो”, अशी पोस्ट विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने केली होती. त्यानंतर आता नातवाच्या जन्मानंतर आजोबा श्याम कौशल यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. सून कतरिनाने मुलाला जन्म दिल्यानंतर विकीचे वडील श्याम कौशल यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नवीन सदस्याच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे.

विकी कौशल बाबा झाल्यानंतर कौशल कुटुंबात सेलिब्रेशन सुरू आहे. कतरिना व विकीसाठी संपूर्ण कौशल कुटुंबीय आनंदी आहेत. आजोबा श्याम कौशल यांनाही नातवाच्या जन्मानंतर आभाळ ठेंगणं झालंय. त्यांनी केलेल्या पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे.

Award Banner

श्याम कौशल यांची पोस्ट

शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शाम कौशल यांनी आपला आनंद व्यक्त केला. “कालपासून माझ्या कुटुंबावर देवाने केलेल्या कृपेबद्दल देवाचे आभार. मी कितीही आभार मानले तरी त्यांच्या आशीर्वादांपेक्षा कमीच असतील. देव खूप दयाळू आहे आणि नेहमीच राहिल. माझ्या मुलांवर आणि सर्वात ज्युनियर कौशलवर देवाची कृपा अशीच राहो. आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. आजोबा झाल्याने मी खूपच आनंदी आहे. देवाचे आशीर्वाद असेच राहोत,” असं श्याम कौशल यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

श्याम कौशल यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. आजोबा झाल्याबद्दल शुभेच्छा, ज्युनियर कौशलच्या आगमनाच्या शुभेच्छा, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.

दरम्यान, २०२१ मध्ये लग्न करणाऱ्या विकी व कतरिना यांनी सप्टेंबर महिन्यात पोस्ट करून त्यांच्या आयुष्यात आता चिमुकला सदस्य येणार आहे, असं म्हटलं होतं. कतरिनाचा बेबी बंप फ्लाँट करतानाचा सुंदर फोटो त्यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर ७ नोव्हेंबरला सकाळी एक पोस्ट करून विकीने मुलगा झाल्याची बातम्या चाहत्यांबरोबर शेअर केली.

कतरिना कैफ अजूनही रुग्णालयात आहे. तिची व बाळाची प्रकृती उत्तम आहे. कतरिनाला डिस्चार्ज कधी देण्यात येईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.