"ती अतिशय..." शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं |Shammi Kapoor affair With Mumtaz Turned From Dream To Nightmare know the love story and reason of break up | Loksatta

“ती अतिशय…” शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं

शम्मी कपूर आणि मुमताज यांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण त्यांनी ठेवलेल्या ‘त्या’ अटीमुळे झालं होतं ब्रेकअप

“ती अतिशय…” शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं
(फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

अभिनेत्री मुमताज या हिंदी चित्रपटसृष्टीतील ६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. मुमताज यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या काळातील जवळपास सर्वच चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मुमताजबरोबर काम करण्यास उत्सुक असायचे. त्यावेळच्या हिरोंनाही मुमताज यांच्याबरोबर चित्रपटांमध्ये काम करायला आवडायचं. एका प्रसिद्ध अभिनेत्याचा तर मुमताज यांच्यावर जीव जडला होता.

दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांना मुमताज खूप आवडायच्या. शम्मी कपूर तेव्हा चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. ते मुमताजच्या प्रेमात पडले होते. रिपोर्ट्सनुसार, मुमताज यांचंही त्यांच्यावर प्रेम होतं. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअप झालं तेव्हा मुमताज फक्त १७ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक मुलाखतींमध्येही याचा उल्लेख केला होता.

“मी गरोदर असल्याचं कळताच पालकांनी…” नीना गुप्तांनी सांगितली जुनी आठवण

दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांनी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, “आमची पहिली भेट ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. हा चित्रपट मुमताज यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला होता. त्या काळात मी विधुर होतो आणि मुमताज एक अतिशय सुंदर मुलगी होती. दोघे सोबत होतो, काही काळ आम्ही एकत्र अनेक स्वप्नं पाहिलीत पण नंतर मात्र ती चांगली स्वप्नं वाईट ठरली.”

मुंबईत ई-बाईकवरून फेरफटका मारताना दिसला ‘हा’ अभिनेता; तुम्ही ओळखलंत का?

२०२० मध्ये ‘ETimes’ला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या होत्या की, “कपूर कुटुंबाला त्यांच्या सुनांनी फिल्म लाईनमध्ये काम करावं हे पसंत नव्हतं. शम्मीजींनी मला सांगितलं होतं की जर मला त्यांना माझ्यासोबत आनंदी राहायचे असेल तर मला माझं करिअर सोडावं लागेल. पण त्यावेळी माझी काही स्वप्नं होती आणि मला आयुष्यात यशस्वी व्हायचं होतं. मलाही संसार करायचा होता, पण नुसतं घरात बसून राहणं मला मंजूर नव्हतं.” त्यामुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं होतं.

‘The Kashmir Files’च्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकाने बिग बींच्या शेजारी घेतलं आलिशान घर, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

मुमताज आणि शम्मी कपूर यांची जोडी मोठ्या पडद्यावर खूप लोकप्रिय होती. त्यांनी ‘ब्रह्मचारी’ आणि ‘वल्ला क्या बात है’मध्ये एकत्र काम केलं होतं. मुमताज यांनी अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. त्यांनी सर्वाधिक ८ सुपरहिट चित्रपट राजेश खन्ना यांच्यासोबत दिले होते. 

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 16:50 IST
Next Story
फातिमा सना शेखचं तिच्या गंभीर आजाराबद्दल वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “मला काम…”