अभिनेता प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रभास श्री रामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रभासला श्री रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणी यावरून असे समोर आले की, शरद केळकर प्रभासचा बॉलिवूडमधील आवाजाच्या रूपात परत आला आहे.

आणखी वाचा : Video: करीना कपूरबरोबर घडली धक्कादायक घटना, एकाने केला खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्याने…

शरद केळकरच्या आवाजाने प्रभासला संपूर्ण भारताचा स्टार बनवले. पण नंतर प्रभासच्या सगळ्या हिंदी चित्रपटांचे डबिंग त्याने स्वतः केले. त्याचा परिणाम असा झाला की, प्रभासचे ते सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. प्रभासची इच्छा असूनही त्याला ‘बाहुबली’नंतर बॉलिवूडमध्ये यश कमावता आलं नाही. अशा परिस्थितीत आता चित्रपट निर्मात्यांना प्रभासच्या हिंदी आवाजासाठी पुन्हा एकदा शरद केळकरचीच आठवण झाली. प्रभासला बॉलिवूडमध्ये चमकायचे असेल तर शरद केळकरशिवाय पर्याय नाही हे निर्मात्यांना समजले आहे.

एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’च्या हिंदी व्हर्जनमध्ये शरद केळकरने प्रभासला आवाज दिला होता. संपूर्ण भारतात प्रदर्शित झालेले हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ने बॉक्स ऑफिसवर केवळ विक्रमच केले नाहीत तर, प्रभासला संपूर्ण भारतात स्टार बनवले. याचाच अर्थ प्रभासला बॉलीवूडचा स्टार बनवण्यात शरद केळकरचीही महत्त्वाची भूमिका होती. पण ‘बाहुबली’ हिट होण्यामागे प्रभासचे स्टारडम आणि बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची गर्दी खेचण्याची त्याची क्षमता हे कारण असल्याचे म्हटले जात होते.

प्रभासला संपूर्ण भारतातील सुपरस्टार बनवण्यात शरद केळकरचाही वाटा असल्याचे मान्य करण्यास निर्मात्यांनी नकार दिला. याच कारणामुळे ‘बाहुबली’नंतर साऊथ चित्रपट निर्मात्यांनी प्रभाससोबत बनवलेले ‘साहो’ आणि ‘राधे श्याम’ हे दोन पॅन इंडिया चित्रपट चांगलेच अपयशी झाले. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रभासच्याच आवाजात हिंदी व्हर्जन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : ठरलं! ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक

परिणामी, जेव्हा ‘साहो’ आणि ‘राधे श्याम’ रिलीज झाले तेव्हा प्रेक्षकांनी प्रभासचे हिंदी आणि त्याची संथ संवादफेक यावर टीका केली. प्रभासने हिंदी चित्रपटांसाठी डबिंग करावे, असे सर्वांचे म्हणणे होते. पण दोनदा चित्रपट अपयशी झाल्यावर प्रभासचा आवाज हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी खेचू शकत नाही हे आता सर्वांनाच समजले. त्यामुळेच ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी प्रभासचा हिंदी आवाज म्हणून लगेचच शरद केळकरला निश्चित केले. या चित्रपटात श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासला पुन्हा एकदा शरद केळकरने आवाज दिला आहे.