बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते शरत सक्सेना त्यांच्या हटके भूमिकांसाठी ओळखले जातात. शरत यांनी आजवर मिस्टर इंडिया, बागबान, क्रिश, गुलाम, शेरनी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी देखील शरत सक्सेना अगदी फिट आहेत. मध्यंतरी त्यांनी चित्रपटात मिळणाऱ्या एकसूरी भूमिकांबद्दल भाष्य केलं होतं.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शरत सक्सेना यांनी आणखी एक खंत व्यक्त केली आहे. त्यांना २५-३० वर्षांत केवळ अॅक्शन आणि फायटिंग सीनसाठीच जास्तकरून घेण्यात आलं अशी खंत शरत यांनी व्यक्त केली आहे. तसेच कालांतराने मुंबईत काम मिळत नसल्याने त्यांनी दक्षिणेत काम करायला सुरुवात केल्याचाही शरत यांनी खुलासा केला.

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : “इतक्या खालच्या थराला…” संगीता व विनेश फोगटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोबद्दल उर्फी जावेदचं ट्वीट चर्चेत

या मुलाखतीमध्ये शरत म्हणाले, “मुंबईत काम मिळायचं बंद झाल्यावर मी माझा मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळवला. मला केवळ फाईट सीन्ससाठीच चित्रपटात घेतलं जायचं. नेहमी सकाळी उठल्यावर मी जेव्हा कामाला जायचो तेव्हा मी आरशात माझा चेहेरा बघून स्वतःलाच कोसायचो, कारण आता शूटिंगसाठी गेल्यावर मला मारून हीरोची कहाणी पुढे सरकायची, गेली २५ ते ३० वर्षं मी हेच काम करत होतो.”

पुढे शरत म्हणाले, “जेव्हा मी माझ्या बायकोला विचारलं की आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत का? अन् जेव्हा मला समजलं की आमच्याकडे वर्षभर पुरतील इतके पैसे आहेत तेव्हा मी हिंदी चित्रपटात काम करायचे बंद केले. माझं नशीब इतकं बलवत्तर होतं की त्यानंतर तीन दिवसांनी मला कमल हासन यांच्या ऑफिसमधून कामासाठी फोन आला. त्यांनी तमिळ चित्रपट ‘गुनाह’मध्ये मला भूमिका दिली, त्यासाठी मिळणारं मानधन आणि भूमिका दोन्ही चांगलं होतं.

अशारीतीने कालांतराने शरत यांनी रजनीकांत, चिरंजीवीसारख्या बड्याबड्या कलाकारांबरोबर काम केलं. एवढंच नव्हे तर प्रियदर्शनच्या ५ ते ६ मल्याळम चित्रपटातही शरत यांनी काम केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत शरत यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे.