सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्याशी २३ जून रोजी लग्न करणार आहे, असं म्हटलं जात आहे. सोनाक्षी व झहीर दोघेही मुंबईत लग्न करतील. सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्यांवर तिचे वडील व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची पत्रिका गुरुवारी ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच ते तिच्या लग्नाच्या बातमीची पुष्टी करत नाहीयेत किंवा नाकारतदेखील नाही. पण तिने जर लग्न केलं तर तिला आशीर्वाद नक्कीच देईन, असंही त्यांनी नमूद केलं.

Loksatta vyaktivedh Suniti Jain Information Officer at Information Center Delhi Government of Maharashtra Everest Base Camp
व्यक्तिवेध: सुनीती जैन
Devendra Fadnavis on Dharmaveer 2
Dhramveer 2: “मी जेव्हा सिनेमा काढेल तेव्हा…”, ‘धर्मवीर २’ ट्रेलर लाँच करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Harshvardhan Patil
हर्षवर्धन पाटलांचं इचलकरंजीबद्दलच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण; म्हणाले, “असं विधान मी…”
pl Deshpande, sunita Deshpande
हरिश्चंद्राची बहीण.. : औदार्याचा विलक्षण अनुभव
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
aaliyah kashyap commented on ambani wedding
“अनंत अंबानीचे लग्न म्हणजे सर्कस,” अनुराग कश्यपच्या मुलीची टीका; म्हणाली, “मी जायला नकार दिला कारण…”
Shatrughan Sinha on son skipping Sonakshi wedding
सोनाक्षी-झहीरच्या लग्नाला मुलाच्या गैरहजेरीबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आमच्या कुटुंबाचे नाव खराब…”
Luv Sinha confirms he skipped sister Sonakshi Sinha wedding
राजकारण्याशी जवळीक, ईडी चौकशी अन् दुबई…, सोनाक्षी सिन्हाच्या सासऱ्यांबद्दल तिच्या भावाची पोस्ट चर्चेत

झहीर इक्बालशी लग्नाच्या चर्चा, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांपेक्षा…”

सोनाक्षी आपली लाडकी लेक असल्याचं शत्रुघ्न टाइम्स ऑफ इंडियाला म्हणाले. “सोनाक्षी माझी एकुलती एक मुलगी आहे अन् ती माझ्या खूप जवळ आहे. जर माझ्या मुलीचे लग्न होत असेल तर मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देईल. सोनाक्षीला तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे आणि मी तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात आनंदी बाबा असेन,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का? जोडप्याने खास मेसेज केलाय शेअर

आधी काय म्हणाले होते शत्रुघ्न सिन्हा

“आम्हाला आमच्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही बेकायदेशीर किंवा चुकीचा निर्णय घेणार नाही. एक सज्ञान म्हणून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा केव्हा माझ्या मुलीचे लग्न होईल तेव्हा मला वरातीसमोर नाचायला आवडेल. तसेच आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी घेत नाहीत, तर त्यांना कळवतात. आम्हीही त्याचीच वाट पाहत आहोत,” असं शत्रुघ्न सिन्हांनी म्हटलं होतं.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

सोनाक्षीच्या लग्नाच्या पत्रिकेत काय लिहिलंय?

या ऑडिओ मेसेजच्या सुरुवातीला हे दोघे म्हणतात, “आमच्या सर्व, टेक सॅव्ही व गुप्तहेर मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांना हाय!” झहीर पुढे म्हणतो, “गेल्या सात वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आनंद, प्रेम, एकमेकांसोबत हसणं या सगळ्या गोष्टींना आम्हाला या क्षणापर्यंत आणलं आहे.”

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल पारंपरिक पद्धतीने लग्न करणार की निकाह? जवळच्या मैत्रिणीने दिली मोठी माहिती

सोनाक्षी पुढे म्हणते, “तो क्षण जेव्हा आम्ही एकमेकांच्या कथित गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पलीकडे जाऊन पुढचं पाऊल उचलतोय.” झहीर म्हणतो, “एकमेकांचे अधिकृत पती-पत्नी बनण्यासाठी.” यानंतर दोघे एकत्र म्हणतात, “तर तुमच्याशिवाय हे सेलिब्रेशन पूर्ण होणार नाही, म्हणून २३ जूनला तुम्ही जे काही करत आहात ते सोडून आमच्याबरोबर पार्टी करा.”