अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी २३ जून रोजी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या लग्नाबद्दल तिचे वडील ज्येष्ठ अभिनेते व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाबद्दल अभिनेत्रीचा मोठा भाऊ लव सिन्हा याने मौन सोडलं आहे. लव सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.

लव सिन्हा सध्या मुंबईत नाही, त्याने सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल मौन बाळगणं पसंत केलं आहे. लग्नाच्या चर्चा सुरू आहेत, त्याबद्दल त्याने काहीच उत्तर द्यायचं नाही, असं म्हटलं. ‘नो कमेंट्स’ असं लव म्हणाला. तसेच त्याचा या लग्नात कोणताही सहभाग नसल्याचं तो म्हणाला. “मी सध्या मुंबईबाहेर आहे. बातम्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत बोलायचं झाल्यास मला त्यावर काहीच टिप्पणी करायची नाही. माझा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही,” असं लव ‘इ-टाइम्स’ शी बोलताना म्हणाला.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

काय म्हणाले होते शत्रुघ्न सिन्हा?

“तिने मला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मी जेवढं माध्यमांमध्ये आलंय तेवढंच वाचलं आहे. जर आणि जेव्हा ती मला आणि माझ्या पत्नीला याबद्दल विश्वासात घेऊन सांगेल, तेव्हा आम्ही जोडप्याला आशीर्वाद देऊ. ती नेहमी आनंदी राहो, याच शुभेच्छा. आम्हाला आमच्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही. एक सज्ञान म्हणून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा केव्हा माझ्या मुलीचे लग्न होईल तेव्हा मला वरातीसमोर नाचायला आवडेल,” असं शत्रुघ्न सिन्हा ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना म्हणाले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

“माझ्या जवळचे लोक मला लग्नाबद्दल विचारत आहेत की मला या कथित लग्नाबद्दल का माहीत नाही आणि मीडियाला याबद्दल माहीत आहे. यावर मी फक्त इतकंच म्हणू शकतो की आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी घेत नाहीत, तर त्यांना कळवतात. आम्हीही त्याचीच वाट पाहत आहोत,” असं ते म्हणाले.

हेही वाचा – झहीर इक्बालशी लग्नाच्या चर्चा, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांपेक्षा…”

दरम्यान, सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. पत्रिकेच्या पहिल्या पानावर ‘अफवा खऱ्या आहेत’ असं लिहिलं आहे. तसेच सर्व पाहुण्यांना फॉर्मल्समध्ये लग्नात येण्यास सांगितलं आहे. या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियन येथे होणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.