ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्याशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे. या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहणार नसल्याच्या खूप चर्चा होत होत्या, याबाबत आता त्यांनी स्वतःच प्रतिक्रिया देत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा लाडक्या लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. इतकंच नाही तर सोनाक्षी आणि झहीर एकत्र खूप छान दिसतात, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “मला सांगा, हे कोणाचं आयुष्य आहे? हे माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचे आयुष्य आहे, जिचा मला खूप अभिमान आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती मला तिचा आधारस्तंभ म्हणते. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नक्कीच जाईन. मी का जाऊ नये? तिचा आनंद हाच माझा आनंद आणि माझा आनंद हाच तिचा आनंद आहे. तिला तिचा जोडीदार आणि तिच्या लग्नाचे इतर सर्व निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

शत्रुघ्न सिन्हा नाराज, लाडक्या लेकीच्या लग्नाला जाणार नाहीत? अभिनेत्रीचे मामा म्हणाले, “सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबात…”

लोकसभा निवडणुकांमुळे दिल्लीत होतो आणि खूप व्यग्र होतो, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं. “मी माझ्या राजकीय कामांमुळे दिल्लीत होतो, पण मी आता मुंबईत आहे. यावरून हेच दिसून येतं की मी फक्त तिचा आधारस्तंभ नाही तर तिचा कवच आहे. सोनाक्षी व झहीरला एकत्र संसार करायचा आहे आणि ते दोघे सोबत खूप छान दिसतात,” असं ते म्हणाले.

सोनाक्षी सिन्हाने लग्नाआधी झहीर इक्बालच्या कुटुंबासह घालवला वेळ, होणाऱ्या नणंदेने शेअर केला Family Photo

यावेळी त्यांनी सिन्हा कुटुंबातील तणावाबाबतच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. या सर्व खोट्या बातम्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. “जे खोट्या बातम्या पसरवत आहेत, ते या आनंदाच्या प्रसंगी खूप निराश आहेत कारण ते खोटी माहिती पसरवत आहेत. मी त्यांना माझ्या सिग्नेचर डायलॉगने सावध करू इच्छितो, खामोश, माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलणं हे तुमचं काम नाही, तुम्ही तुमचं काम करा,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

सोनाक्षी व झहीरचं लग्न

झहीर व सोनाक्षी २३ जून रोजी रविवारी मुंबईत लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाला झहीर व सोनाक्षी या दोघांच्या कुटुंबियांसह नातेवाईक व अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हनी सिंग, डेझी शाह, पूनम ढिल्लों यांच्यासह अनेकांना या जोडप्याने लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. याशिवाय ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील सर्व स्टारकास्ट या लग्नाला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.