‘काटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवाला बाळ दत्तक घेण्याबद्दलच्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने सेरोगसीसाठी नकार दिला असून तिला बाळ दत्तक घ्यायचं आहे. यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचंही शेफालीने सांगितलं आहे. बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी खूप वेळ लागत असल्याचं शेफालीचं म्हणणं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेफाली जरीवालाचे पहिले लग्न फार काळ टिकले नव्हते. तिने पूर्वाश्रमीच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर शेफालीची भेट पराग त्यागीशी झाली. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर शेफालीने परागशी लग्न केले आणि आता तिला आई व्हायचं आहे. ‘ई-टाइम्स’शी बोलताना शेफाली म्हणाली, “यापूर्वीही मी मूल दत्तक घेण्याबाबत मुलाखतींमध्ये खुलेपणाने माझं मत व्यक्त केलं आहे. मला माझं कुटुंब पूर्ण करायचं आहे. बाहेरच्या जगात अशी कितीतरी मुलं आहेत जी अनाथ आहेत, ज्यांना घराची गरज आहे. मी आणि पराग आम्हा दोघांना जेनेटिक लिंकेजची काळजी नाही, मूल स्वतःचंच असावं असंही आम्हाला वाटत नाही, त्यामुळे आम्ही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. पण ही प्रक्रिया अजिबात सोपी नाही.”

सोनाली बेंद्रेवर जडलेला पाकिस्तानी क्रिकेटपटूचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, म्हणालेला “तिने नकार दिल्यास…”

शेफाली पुढे म्हणाली की, “कायदेशीर प्रक्रिया खूप लांब आहे. यामध्ये पैशांचा खर्चही खूप येतो. काही वेळा या संपूर्ण प्रकरणाला चार वर्षांचा कालावधी लागतो. पराग आणि मी असा विचार करत होतो की आम्हा दोघींना एक छोटा पाहुणा येणार आहे, तेवढ्यात कोविड आला. अनेक गोष्टी बदलल्या. प्रक्रिया थांबली. आम्हा दोघांसाठी बरीच गतिशीलता आणि टाइमलाइन देखील बदलल्या आहेत. आम्ही दोघेही खूप अस्वस्थ होतो. जगात मुलांपेक्षा जास्त पालक आहेत जे त्यांना दत्तक घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. आपणही त्यापैकीच एक आहोत. बाळ दत्तक घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला थोडा वेळ लागतो, परंतु मला आशा आहे की हे सर्व लवकरच पूर्ण होईल आणि मी लवकरच आई होऊ शकेन.”

“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

शेफाली पुढे म्हणाली की, “कायदेशीर प्रक्रिया खूप लांब आहे. यामध्ये पैशांचा खर्चही खूप येतो. काही वेळा या संपूर्ण प्रक्रियेला चार वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. पराग आणि मी घरात छोटा पाहुणा येणार असा विचार करत असतानाच करोना आला आणि अनेक गोष्टी बदलल्या, प्रक्रिया थांबली. त्यामुळे आम्ही दोघेही खूप अस्वस्थ झालो होतो. जगात मुलांपेक्षा जास्त पालक आहेत, जे त्यांना दत्तक घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. आम्हीही त्यापैकीच एक आहोत. बाळ दत्तक घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला थोडा वेळ लागतो, परंतु मला आशा आहे की हे सर्व लवकरच पूर्ण होईल आणि मी लवकरच आई होऊ शकेन.”

शेफाली आणि पराग एकत्र खूप खूश आहेत. ते दोघेही सुट्टीवर जात असतात, तिथून त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. दोघांना आता पालक व्हायचंय आणि बाळ दत्तक घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shefali jariwala husband parag tyagi wants to adopt baby says process is not easy hrc
First published on: 25-03-2023 at 13:36 IST