अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सलमानच्या आगामी चित्रपट किसी का भाई किसी जान चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. काही दिवसांपूर्वी पलकने सलमान खानच्या सेटवरील एक नियम सांगितला होता. सलमानच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने स्पष्ट केलं होतं. पलक तिवारीच्या या वक्तव्यांनंतर चर्चांना चांगलेच उधाण आले होते. आता शहनाज गिलने पलकच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे.

हेही वाचा- सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कमाई; अवघ्या काही तासांतच कमावले ‘इतके’ कोटी

शेहनाजनं म्हणाली, सेटवर अभिनेत्रींनी तोकडे कपडे खालू नये असा कोणताही नियम सलमान खाननं केलेला नाही. मी स्वत: ट्रेलर लाँचच्या वेळेस हॉट कपडे घातले होते. ज्यात क्लीवेज होतं. शहनाज गिलने पलक तिवारीचे सलमान खानवरील वक्तव्य खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच सलमान खानने सेटवरील अभिनेत्रींसाठी असा कोणताही नियम केला नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

काय म्हणाली होती पलक तिवारी

सलमानच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने स्पष्ट केलं. याविषयी बोलताना पलक म्हणाली, “सलमान सर खूप पारंपरिक आहेत. मुलींनी जे योग्य वाटेल ते कपडे परिधान करावे पण त्यांच्या सुरक्षित असावं हा त्यांचा हेतू असतो. सेटवर बरेच अनोळखी पुरुष वावरत असतात त्यामुळे प्रत्येकावर पूर्ण विश्वास टाकणं त्यांना जमत नाही. त्यामुळे सेटवरील मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हा नियम केला आहे.”अस पलक म्हणाली होती.

हेही वाचा- शहनाझ गिलबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर राघव जुयालने सोडलं मौन, म्हणाला…

हार्डी संधुबरोबरच्या ‘बिजली बिजली’ या गाण्यातून पलकला प्रसिद्धी मिळाली. सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये पूजा हेगडे, शेहनाज गिल, पलक तिवारी या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याबरोबरच जगपती बाबू हे या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.