scorecardresearch

“विक्रम बत्राही…” Sidharth Malhotra-Kiara Advani च्या लग्नाबद्दल ‘शेरशाह’च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया

सिद्धार्थ व कियारा यांनी दिवंगत लष्करी अधिकारी विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

shershaah-song-sidharth-kiara
सिद्धार्थ मल्होत्रा – कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी आज जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते आज कुटुंबीय व मित्रांच्या उपस्थित लग्नबंधनात अडकतील. त्यांच्या लग्नासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. दोघांचं लग्न आज होणार असलं तरी त्यांच्या चाहते व बॉलिवूडकर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आकर्षक रोषणाई, म्युझिक, अन्…; Sidharth Malhotra-Kiara Advani चा संगीत सोहळा पडला पार, Video व्हायरल

सिद्धार्थ व कियारा यांनी दिवंगत लष्करी अधिकारी विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्यात जवळीक वाढली आणि नंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. गेली तीन वर्षे एकमेकांच्या प्रेमात असलेलं हे जोडपं आज लग्न करून वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार आहे. त्यांच्या लग्नानिमित्त ‘शेरशाह’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत घर, गाड्या अन्…; कियारा अडवाणीपेक्षा तिप्पट श्रीमंत आहे सिद्धार्थ मल्होत्रा, जाणून घ्या दोघांच्या संपत्तीबद्दल

चित्रपटाचे निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी सिद्धार्थ आणि कियारासाठी खूप आनंदी आहे. ते अद्भुत लोक आहेत आणि मला आनंद आहे की ‘शेरशाह’चे रील लाइफ जोडपं खरोखरच्या आयुष्यात लग्न करत आहे. मला खात्री आहे की विक्रम बत्राही त्यांना वरून आशीर्वाद देत असतील.”

ते पुढे म्हणाले की “मी ऐकलं आहे की त्यांचा विवाह हा एक खासगी समारंभ आहे, ज्यात फक्त काही मोजकेच लोक उपस्थित राहतील. मी त्यांना खूप शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद देतो.” शब्बीर बॉक्सवाला यांनी सिद्धार्थ-कियाराला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 09:54 IST