scorecardresearch

धोनीच्या पाठोपाठ शिखर धवनचीही बॉलिवूडमध्ये एंट्री, ‘या’ अभिनेत्रीसह क्रिकेटपटू दिसणार रोमँटिक अंदाजात

क्रिकेटर शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

shikhar dhavan, Sonakshi Sinha, Huma Quershi, DOUBLE XL, shikhar dhavan Movie Debut, indian cricket team, cricket, हुमा कुरेशी, श‍िखर धवन, श‍िखर धवन डेब्‍यू
शिखर धवन लवकरच बॉलिवूड चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. त्याने स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं असून अभिनयात नाही तर निर्मिती क्षेत्रातून तो बॉलिवूड पदार्पण करत आहे. अर्थात धोनीच्या अगोदर हरभजन सिंग, इरफान पठाण, एस श्रीसंत यांनी अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं आहे. पण आता यानंतर प्रसिद्ध क्रिकेटक शिखर धवनही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शिखर धवन लवकरच बॉलिवूड चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याच चित्रपटात शिखर धवन दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेश या चित्रपटातून लठ्ठ महिलांची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ज्या आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात. सतराम रमानी यांच्या दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लठ्ठ महिलांसंबंधी असलेल्या काही समस्या आणि गैरसमजांवर भाष्य केलं जाणार आहे. याच चित्रपटात शिखर धवन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
आणखी वाचा-रेखा यांचं नाव ऐकून भडकले होते अमिताभ बच्चन, सर्वांसमोर केला होता पत्नी जया यांचा अपमान

वाढलेल्या वजनामुळे चिंतेत असलेल्या लोकांच्या अनेक कथा चित्रपटांमध्ये दाखवल्या गेल्या आहेत. पण दिग्दर्शक सतराम रमानी यांचा डबल एक्सएल हा चित्रपट ज्याप्रकारे या महिलांची कथा सांगतो त्यानुसार या चित्रपटाचं वेगळेपण अधोरेखित होतं. सोनाक्षी आणि हुमाच्या या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता झहीर इक्बाल आणि महत राधवेंद्र दिसणार आहेत. या दोन कलाकारांशिवाय या चित्रपटात क्रिकेटर शिखर धवनही दिसणार आहे. शिखर या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा- MS धोनीला रुपेरी पडद्याची भुरळ, चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका

आपल्या या भूमिकेबद्दल शिखर धवन म्हणाला, ‘देशासाठी खेळताना मी माझ्या आयुष्यात नेहमीच खूप काम केलं आहे. अशा परिस्थितीत मी नेहमीच मनोरंजनासाठी चित्रपट पाहतो. जेव्हा ही ऑफर माझ्याकडे आली आणि मी ही कथा ऐकली तेव्हा ही कथा मनात खोलवर स्पर्श करून गेली. ही कथा समाजाला एक खास संदेश देणार आहे आणि मला आशा आहे की हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक मुली आपली स्वप्ने पूर्ण करण्यात मागे हटणार नाहीत. दरम्यान हुमा आणि सोनाक्षीचा हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2022 at 14:55 IST

संबंधित बातम्या