'बेशरम रंग'मध्ये दीपिका पदुकोण..." गाण्याची पार्श्वगायिका शिल्पा रावचं वक्तव्य चर्चेत | shilpa rao praise deepika padukon acting in besharam rang song | Loksatta

‘बेशरम रंग’मध्ये दीपिका पदुकोण…” गाण्याची पार्श्वगायिका शिल्पा रावचं वक्तव्य चर्चेत

‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भागव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

shilpa rao

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सर्वच शोज हाऊसफुल होताना दिसत आहेत. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट चर्चेत आला होता. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भागव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यामुळे दीपिकाला खूप ट्रोल करण्यात आलं. आता या गाण्याची पार्श्वगायिका शिल्पा राव हिने या गाण्यातील दीपिकाच्या परफॉर्मन्सबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘पठाण’ चित्रपटाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहेत, तर जगभरातून ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. अनेकांनी ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर्सच बूक केली. तर या चित्रपटाचा शो सुरू असताना चित्रपटगृहतील माहोल कसा असतो हे दर्शवणारे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटीही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. लोकप्रिय गायिका शिल्पा राव हिने दीपिकाच्या कामाचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”

हेही वाचा : Video: शाहरुख खानसाठी काहीपण! ‘पठाण’ सुरू असताना चाहत्याने चित्रपटगृहात उडवल्या नोटा, व्हिडीओ चर्चेत

शिल्पा आणि दीपिका अनेक वर्षांपासून एकमेकींना ओळखतात. बेशरम रंगच्या आधीही शिल्पाने गायलेली काही गाणी दीपिकावर चित्रित झाली आहेत. शिल्पा म्हणाली, “दीपिकाचा विषय निघाला की माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं. कारण तिचं व्यक्तिमत्वं तसंच आहे. मी आतापर्यंत ज्या लोकांबरोबर काम केलं त्यापैकी सर्वात छान व्यक्तींच्या यादीत दीपिका आहे. तिला भेटल्यावर नेहमीच एक सकारात्मकता जाणवते. ज्या प्रकारे ती बोलते किंवा आय कॉन्टॅक्ट करते ते मला फार आवडतं. ‘बेशरम रंग’ या गाण्यात ती स्वतःला सेलिब्रेट करत आहे आणि ते मला फार आवडलं. आम्ही दोघी अर्ध-अर्ध काम करतो. पडद्याच्या मागे मी एक्सप्रेशन्स देते आणि पडद्यावर ती तिच्या कामाने बहार आणते.” आता तिचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 14:21 IST
Next Story
Video : सनी लिओनीचा चित्रपटाच्या सेटवर अपघात, रक्त पाहून अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था