Shilpa Shetty Dhurandhar 2 Review : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ अखेर मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच दुसरा भाग येणार, यामुळे या चित्रपटाचीच गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. ‘धुरंधर’च्या दमदार यशानंतर प्रेक्षकांचे दुसऱ्या भागाकडे लक्ष लागले होते. अखेर हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला असून अनेक सेलिब्रिटी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.
‘धुरंधर २’ बद्दल फक्त प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटीही बोलताना थकत नाहीयेत. पेड प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर अनेकांनी अल्लू अर्जुन, राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेकांनी पोस्ट केल्या आहेत. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘धुरंधर २’ कसा आहे, याबद्दल तिचं मत फक्त तीन शब्दांत व्यक्त केलं आहे.
शिल्पा शेट्टीने तिची बहीण शमिता शेट्टी व आईबरोबर रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ पाहिला. ‘धुरंधर २’ची सेलिब्रिटींमध्ये इतकी क्रेझ आहे की बऱ्याच जणांनी तो पेड प्रिव्ह्यूमध्ये पाहिला. शिल्पा शेट्टीही ही चित्रपट पाहून आली. नंतर गाडीत बसताना तिने या सिनेमाचा रिव्ह्यू केला. शिल्पा शेट्टीला धुरंधर २ बद्दल विचारलं असता ती ‘आग लगा दी’ इतकंच म्हणते. वरिंदर चावला या पापाराझी अकाउंटवरून शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
शिल्पा शेट्टी धुरंधर २ बद्दल म्हणाली…
धुरंधर २ चा रनटाइम ३ तास ५५ मिनिटं म्हणजेच जवळपास ४ तास आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. अल्लू अर्जुननेही हा चित्रपट पाहिल्यावर एक्सवर पोस्ट केली आहे.
अल्लू अर्जुनने केलं धुरंधर २ चं कौतुक
“आत्ताच धुरंधर 2 पाहिला. देशभक्ती आणि ‘स्वॅग’सह!
हा चित्रपट प्रत्येक देशभक्ताला अभिमान वाटायला लावेल.
यात अनेक प्रसंग आहेत जे तम्हाला टाळ्यांचा कडकडाट करायला लावतील.
धमाकेदार चित्रपट!
संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन.
माधवन आणि इतर सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम आहे. तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट उत्कृष्ट आहे.
माझा भाऊ रणवीर सिंहसारखा एक अत्यंत हुशार आणि अष्टपैलू अभिनेता आपल्या देशात आहे, याचा मला अभिमान वाटतो. त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे!
आदित्य धर यांनी तर कमालच केली आहे. त्यांच्यासारखे उत्तम चित्रपट निर्माते आपल्या देशात असल्याचा मला खूप आनंद आहे.
जबरदस्त चित्रपट
एक भारतीय कथा… पण आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘स्वॅग’!
जय हिंद,” असं अल्लू अर्जुनने पोस्टमध्ये लिहिलंय.

दरम्यान, धुरंधर २ ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर आता प्रेक्षकांची गर्दी पाहता हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार यात शंका नाही. चित्रपट जगभरात किती कोटींचे ओपनिंग कलेक्शन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
