शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला करोनाची लागण, नेटकऱ्यांनी मात्र आजारपणाची उडवली खिल्ली, म्हणाले, “पूर्ण तोंड…”

करोनाची लागण झाल्यानंतर राज कुंद्रा का होतोय ट्रोल? नेमकं प्रकरण काय?

Shilpa Shetty Husband Raj Kundra Corona Positive
करोनाची लागण झाल्यानंतर राज कुंद्रा का होतोय ट्रोल? नेमकं प्रकरण काय?

करोना विषाणू पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाक्षेत्रातील काही मंडळींना सध्या या विषाणूचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच किरण खेर, पूजा भट्टला करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त समोर आलं. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री माही वीजनेही तिला करोना झाला असल्याचं व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. आता यापाठोपाठ शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालाही करोनाची लागण झाली आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता कलाकार मंडळी विशेष खबरदारी घ्या असं सातत्याने सांगत आहेत. तसेच काही कलाकारांना या विषाणूमुळे बराच त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. पण याबाबत शिल्पा किंवा राज कुंद्राने कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही.

आणखी वाचा – प्रेमविवाह, वाद, आर्थिक चणचण अन्…; ४० वर्षांनंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत स्मृती इराणींचं भाष्य, म्हणाल्या, “त्यांच्यामध्ये…”

विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे राज कुंद्राला करोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं. पण या पोस्टनंतर सोशल मीडियाद्वारे त्याची खिल्ली उडवण्यात येत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये अडकल्यानंतर राज कॅमेऱ्यापासून त्याचा चेहरा लपवतो. कॅमेऱ्यापासून चेहरा लपवण्यासाठी तो संपूर्ण तोंड एका वेगळ्याच मास्कने लपवण्याचा प्रयत्न करतो. याचमुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं आहे.

आणखी वाचा – शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली…

पूर्ण तोंड झाकलेलं असतानाही राजला करोनाची लागण झाल्यामुळे नेटकरी त्याची खिल्ली उडवत आहेत. अधिक काळजी घेतल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असावा, इतकी काळजी घेऊनही तुला करोनाची लागण कशी झाली? हा सुपरहिरो बनून का फिरतो? काहीपण बोला पण राज कुंद्राचा मास्क अगदी मस्त आहे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 18:49 IST
Next Story
तीन अफेअर, विवाहित अभिनेत्याला १० वर्ष केलं डेट पण…; ५२व्या वर्षीही तब्बू आहे अविवाहित, कोणतंच नातं टिकलं नाही कारण…
Exit mobile version