बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या मास्क मॅन म्हणून ओळखला जातो. पॉर्नोग्राफी प्रकरणात त्याचं नाव आल्यापासून तो चेहरा लपवत दिसत असतो. अतरंगी मास्क घालून फिरत असतो. त्यामुळे राज कुंद्रा नेहमी चर्चेत असतो. अशातच तो आता अभिनेत्री ईशा गुप्ताबरोबरच्या एका व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. हेही वाचा - Video: श्रद्धा कपूरने रश्मिका मंदानाला केलं इग्नॉर?; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूडमधील लोकांना जास्त अहंकार…” काही दिवसांपूर्वी करीना कपूरच्या 'जाने जान' या नव्या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला अभिनेत्री ईशा गुप्ताने हजेरी लावली होती. यावेळी ती पापाराझींना फोटो देण्यासाठी वेगवेगळ्या पोझ देत होते. तितक्यात राज कुंद्रा आला. येता येताच तो ईशा गुप्ताला म्हणाला की, "ओमायगॉड, यू आर सो हॉट, यू आर सो हॉट" आणि त्यानं ईशाला मिठ्ठी मारली. त्यानंतर तो लगेच निघून गेला. याच व्हिडीओमुळे राज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोईमोईच्या इन्स्टाग्रावर पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. हेही वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; म्हणाली, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला…” या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, "जेलमध्ये जाऊन आला तरी सुधारला नाही." तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, "ईशाने कदाचित कुंद्राचा चित्रपट साइन केलाय वाटतं." तर तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, "राज कुंद्रा म्हणे, मी तुला अडल्ट चित्रपटात काम देऊ शकतो." हेही वाचा – “खूप धाडस करुन हे पाऊल उचलते…” ‘ रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचं नव्या क्षेत्रात पदार्पण दरम्यान, २०२१ला पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं रॅकेट चालवतं असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अनेक महिलांनी राज कुंद्राविरोधात साक्ष दिली होती. या प्रकरणानंतर शिल्पाने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राज कुंद्राच घर सोडल्याची अफवा पसरली होती. पण शिल्पा असं काही न करता पती राजच्या पाठिशी खंबीर उभी राहिली होती. सर्व आरोप निराधार असल्याचं तिनं सांगितलं होतं.