scorecardresearch

शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “शस्त्रक्रिया…”

शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयामध्ये भरती, अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

shilpa shetty mother shilpa shetty
शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयामध्ये भरती, अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

शिल्पा शेट्टी फिटनेस, फॅशन व तिच्या कामामुळे कायमच चर्चेत असते. शिल्पासह तिची आई सुनंदा यादेखील बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात. शिल्पाचं तिच्या आईवर जीवापाड प्रेम आहे. तिने आईसह शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडीओ व फोटोंमधून ते दिसून आलं आहे. यशस्वी असण्याचं संपूर्ण श्रेय शिल्पा तिच्या आईला देते. आता तिने आईबाबत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाची आई सध्या रुग्णालयामध्ये आहे.

आणखी वाचा – …म्हणून १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खानने किरण रावबरोबर घेतला घटस्फोट; अभिनेत्यानेच केला होता खुलासा

शिल्पाने तिच्या आईचा रुग्णालयामधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुनंदा डॉक्टरसह दिसत आहेत. सुनंदा यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पण गेले काही दिवस अगदी कठीण होतं असं शिल्पाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिल्पाच्या आईची सर्जरी झाली आहे. याबाबत शिल्पानेच खुलासा केला आहे.

शिल्पा म्हणाली, “पालकांवर शस्त्रक्रिया होत आहे हे पाहणं कोणत्याही मुलांसाठी कधीच सोप नसतं. पण हिंमत आणि लढण्याची ताकद हे दोन गुण मला माझ्या आईकडून शिकायचे आहेत. गेले काही दिवस अगदी कठीण होते. पण आईच्या सर्जरी आधी आणि सर्जरी नंतर तिची काळजी घेतल्याबद्दल डॉक्टर राजीव भागवत तुमचे खूप आभार”.

आणखी वाचा – इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना खान ३४व्या वर्षी होणार आई, म्हणाली, “लवकरच…”

“आईची काळजी घेत आहात, तिला पाठिंबा देत आहात त्याबाबत नानावटी रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे खूप आभार. कृपया ती पूर्णपणे बरी होईपर्यंती तिची अशीच काळजी घ्या. प्रार्थना केल्यामुळे चमत्कार घडतात”. शिल्पाच्या आईची नेमकी कोणती सर्जरी करण्यात आली आहे हे तिने उघडं केलं नाही. पण शिल्पाच्या या पोस्टवरुन तिच्या आईची प्रकृती आता सुधारत आहे असं दिसून येतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 12:57 IST