scorecardresearch

Premium

“या देखण्या तरुणाच्या शेजारी तू…”, परिणीची चोप्राच्या भावाची बहिणीच्या लग्नानिमित्त खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीतीचा भाऊ शिवांगने केलेली पोस्ट चर्चेत

shivang chopra post for sister parineeti chopra and raghav chadha wedding
परिणीती व राघव चड्ढा यांच्यासाठी शिवांगची खास पोस्ट

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी रविवारी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. आलिशान पॅलेसमध्ये दोघांचा भव्य विवाहसोहळा पार पाडला. त्यांनी सोमवारी सकाळी इन्स्टाग्रामवर त्यांचे लग्नाचे फोटो शेअर केले. या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, चाहते शुभेच्छा व आशीर्वाद देत आहेत. बहिणीच्या लग्नानिमित्त परिणीतीच्या भावाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नाला गैरहजेरी, बहिणीच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत प्रियांका चोप्रा म्हणाली…

Actor Sagar Karand Suresh Wadkar
Video: सागर कारंडे बऱ्याच काळानंतर दिसला पोस्टमनच्या भूमिकेत, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी पत्र
Jui Gadkari
“खाली का बसला आहात?” नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर जुई गडकरीने दिलं चोख उत्तर, अभिनेत्रीची कमेंट चर्चेत
priyanka Chopra comment on Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos
परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नाला गैरहजेरी, बहिणीच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत प्रियांका चोप्रा म्हणाली…
Dnyanada supriya
‘ठिपक्यांची रांगोळी’तील अप्पूने सांभाळलं सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलचं कॅश काउंटर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

शिवांग चोप्राने पोस्टमध्ये लिहिलं, “काही गोष्टी अगदी योग्य वाटतात. काही लोक अगदी बरोबर वाटतात. काही भावना खूप सुंदर असतात. काही क्षण खूप सुंदर असतात. चोप्रा आणि चढ्ढा यांच्यासाठी….हे सर्व काही खूप फक्त सुंदर होते. जीज कुटुंबात आपले स्वागत आहे. राघव चड्ढा चोप्रा कुटुंबातील क्रेझीनेसमध्ये आपले स्वागत आहे. परिणीती या देखण्या तरुणाच्या शेजारी तू एक सुंदर वधू बनलीस आहे. मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो.”

शिवांगने बहीण परिणीतीची पोस्ट रिपोस्ट करत असं सुंदर कॅप्शन लिहिलं. त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शिवांग हा परिणीतीचा लहान भाऊ आहे. तो परिणीतीपेक्षा ७ वर्षांनी लहान आहे. तो डॉक्टर आहे. परिणीतीला शिवांगशिवाय सहज नावाचाही एक लहान भाऊ आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivang chopra post for sister parineeti chopra and raghav chadha wedding calls everything just beautiful hrc

First published on: 25-09-2023 at 14:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×