प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे २०२० साली कर्करोगामुळे निधन झाले. इरफान आणि दिग्दर्शक शुजित सरकार हे जवळचे मित्र होते. त्यांनी एकत्रितपणे ‘पीकू’ या चित्रपटात काम केले होते. शूजितने अलीकडेच एका मुलाखतीत इरफान खानने कर्करोगाशी दिलेला लढा, त्याची त्या काळातील मानसिक स्थिती यावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इरफानच्या संघर्षाची आठवण

शूजित सरकारने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत इरफान खानच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने सांगितले, “इरफान कर्करोगाशी शारीरिक लढाई लढत असतानाच मानसिकरीत्या मात्र हरत चालला होता.” शूजित पुढे म्हणाला, “इरफान आजारी असताना मी त्याच्याशी नियमितपणे संवाद साधत होतो. दुर्दैवाने तो मानसिकदृष्ट्या या संघर्षाला तोंड देऊ शकला नाही; मात्र तो शेवटपर्यंत लढला.”

हेही वाचा…अभिषेक बच्चन बॉलीवूडमधून घेणार होता कायमची निवृत्ती; बिग बींच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदलला निर्णय; म्हणाला…

‘आय वॉन्ट टू टॉक’साठी प्रेरणा

इरफानचे निधन झाल्यानंतर कर्करोगासारख्या आजारात असणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय शूजित सरकारने घेतला. तो म्हणाला, “ही कथा केवळ इरफानबद्दल नाही, तर कर्करोगासारख्या आजारात मानसिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.

इरफानच्या मृत्यूचे दु:ख आजही कायम

शूजित सरकारने दुसऱ्या एका मुलाखतीत नमूद केले की, तो अद्यापही इरफानच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेला नाहीये. त्याने कबूल केले की ‘पीकू’नंतर त्याला पुन्हा एकदा इरफानबरोबर काम करण्याची इच्छा होती; मात्र, दुर्दैवानं ते शक्य झाले नाही.

हेही वाचा…नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाचा विवाहसोहळा पाहता येणार ओटीटीवर, ‘या’ प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेल्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकारने केले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांत १.५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoojit sircar reveal irrfan khan cancer battle days and his connection with i want to talk movie psg