scorecardresearch

‘हेरा फेरी ३’च्या शूटिंगला अखेर सुरुवात, जाणून घ्या राजूच्या भूमिकेत कार्तिक आर्यन दिसणार की अक्षय कुमार

या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यामुळे राजूची भूमिका अक्षय साकारणार की कार्तिक हे आता स्पष्ट झालं आहे.

hera pheri 3

काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘हेरा फेरी’च्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते. आता अखेर आज या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

मध्यंतरी या चित्रपटाबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला अक्षय कुमारने नकार दिल्यामुळे त्याची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याचं समोर आलं होतं. पण काही दिवसांनी निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यामधील वाद मिटला असून या चित्रपटात अक्षय कुमारच दिसणार असं बोललं जात होतं. आता या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यामुळे राजूची भूमिका अक्षय साकारणार की कार्तिक हे अखेर स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : श्रद्धा कपूरने सांगितलं उत्तम मराठी बोलता येण्यामागचं गुपित, म्हणाली, “कारण मी…”

आज या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगचा श्री गणेशा करण्यात आला. या चित्रपटात परेश रावल, सुनील शेट्टी यांच्याबरोबर राजूच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसेल असं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार राजूची भूमिका कार्तिक आर्यन नाही तर अक्षय कुमारच साकारत आहे. पण या चित्रपटात कुठली अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार हे अजून गुलदस्तात ठेवलं गेलं आहे.

हेही वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा ‘हेरा फेरी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 18:34 IST
ताज्या बातम्या