scorecardresearch

Video: शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटातील अंडरवॉटर सिक्वेन्स लीक?; व्हिडीओ चर्चेत

नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

jawan underwater

२०२३ हे वर्ष शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण यावर्षी तो ३ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तर त्या व्यतिरिक्त ‘जवान’ आणि ‘डंकी’ या दोन चित्रपटांमध्ये तो यावर्षी झळकणार आहे. तर आता त्याच्या जवान या चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. गेले अनेक दिवस शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. आता नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. पण या चित्रपटातील त्याचा अंडरवॉटर सिक्वेन्स लीक झाला आहे असं बोललं जात आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

सोशल मीडियावर काही फोटो आणि एक व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली ही क्लिप ‘जवान’ चित्रपटाच्या अंडरवॉटर सीक्वेन्सचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरवर किंग खानच्या फॅन पेजवर ही क्लिप शेअर करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये एका मोठ्या स्विमिंग टॅंकमध्ये एक अंडरवॉटर सिक्वेन्स शूट होताना दिसत आहे.

हेही वाचा : शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण

आता हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून यावर शाहरुखचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हा व्हिडीओ ‘जवान’ चित्रपटातील असल्याचं म्हटलं. तर काहींनी ही क्लिप एका दुसऱ्याच चित्रपटाची आहे असं म्हणत जवान चित्रपटाबद्दल गुप्तता बाळगली आहे. त्यामुळे आता व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरोखर ‘जवान’ चित्रपटातील आहे का, हे लवकरच समोर येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:11 IST

संबंधित बातम्या