सध्या बॉक्स ऑफिसवर हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह, सत्यराज, सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये असे अनेक तगडे कलाकार मंडळी असलेला हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. ‘मुंज्या’नंतर ‘स्त्री २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच ‘स्त्री २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘स्त्री २’ चित्रपटासाठी प्रेक्षकांना ६ वर्ष वाट पाहावी लागली आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर स्त्रीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण एक ट्विस्ट आहे. ते म्हणजे श्रद्धाबरोबर अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील झळकणार आहे. राजकुमार राव, अपराशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बनर्जी ‘स्त्री २’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल

आज प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’च्या टीझरमध्ये तमन्ना भाटियाची विशेष झलक पाहायला मिळत आहे. हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात डान्स करताना आणि शेवटी हैरान करणारी तमन्नाची झलक आहे. टीझर शेअर करत निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. १५ ऑगस्ट २०२४ला स्वातंत्र्य दिनादिवशी ‘स्त्री २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टीझरच्या सुरुवातीलाच “ओ स्त्री रक्षा करना”, असं एका मोठ्या पुतळ्याखाली लिहिलेलं पाहायला मिळत आहे. राजकुमार राव विकीच्या भूमिकेत झळकला आहे. तसंच श्रद्धा कपूरची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. हा धमाकेदार टीझर पाहून नेटकऱ्यांनी “ओ स्त्री जलदी आना” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘महाराज’ चित्रपटासाठी ४४ वर्षीय अभिनेत्याने घटवलं तब्बल २६ किलो वजन, Fat to Fit फोटो पाहून चाहते झाले चकित

दरम्यान, राजकुमार राव व श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकानी धुरा अमर कौशिक यांनी सांभाळली आहे. ‘भेडिया’ व ‘मुंज्या’ चित्रपटाच्या शेवटी ‘स्त्री २’ संबंधित काही हिंट दिल्या गेल्या होत्या. त्यामुळेच प्रेक्षकांना ‘स्त्री २’ चित्रपटाची खूप उत्सुकता लागली आहे.