बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तिच्या मोहक अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले. झगमगत्या गाउनमधील श्रद्धाचे तेजस्वी रूप आणि तिच्या केसांच्या लूकची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली . मात्र, तिच्या लूकपेक्षा जास्त चर्चा तिच्या आणि अँड्र्यू गारफिल्डच्या फोटोंची झाली.
जगातील विविध सेलिब्रिटी ज्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावतात रेड कार्पेटवर ‘स्पायडरमॅन’ फेम अभिनेता अँड्र्यू गारफिल्ड आणि श्रद्धा कपूर एकत्र आले होते. रेड कार्पेटवर येण्यापूर्वी श्रद्धा आणि अँड्र्यू गारफिल्डने थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर एकत्र पोज दिल्या. श्रद्धा आणि गारफिल्डची ही जोडी पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. अनेकांनी श्रद्धाच्या हॉलिवूड डेब्यू करायला हवा अशा कमेंट केल्या.
हेही वाचा…‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
a crossover we did nawt expect pic.twitter.com/LyKMIAZZ2y
— kp (@earthlykisssed) December 9, 2024
चाहत्यांची प्रतिक्रिया
श्रद्धा आणि अँड्र्यूच्या एकत्र फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला. एका चाहत्याने कमेंट केली, “श्रद्धाचा खूपच जबरदस्त दिसत आहे. ती हॉलिवूडमध्येही कमाल करेल. तिचे उच्चार कौशल्य अप्रतिम आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “अँड्र्यू गारफिल्ड आणि श्रद्धा कपूर??? २०२४ हे खरोखरच अजब वर्ष आहे.” आणखी एका चाहत्याने सांगितले, “अँड्र्यू गारफिल्ड आणि श्रद्धा कपूर भेटले यावर अजूनही विश्वास बसत नाही.”
still not over the fact that andrew garfield and shraddha kapoor met ?pic.twitter.com/pwF1m1D3N1
— bhoomi | babyjohn era ? (@dhawansgirl) December 10, 2024
हॉलिवूडमध्ये डेब्यूची शक्यता
श्रद्धाने हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतल्यास, ती धनुष, आलिया भट्ट, तब्बू, ईशान खट्टर यांसारख्या भारतीय कलाकारांच्या यादीत सामील होईल, ज्यांनी अमेरिकन चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.