Shraddha Kapoor Viral Video : श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती तिचे सुंदर फोटो आणि काहीवेळा गंमतीशीर व्हिडीओ शेअर करत असते. अशातच आता तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आलीये.
श्रद्धा कपूर तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबर अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच आता तिने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केलाय जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. श्रद्धा या व्हिडीओमध्ये मायकल जॅकसनच्या गाण्यावर थिरकताना दिसतेय. यावेळी तिने कमेंट सेक्शनमध्ये तिच्या अनेक चाहत्यांना प्रतीउत्तर देत तिला अलीकडेच आलेला ‘मायकल’ हा चित्रपट आवडला असून सध्या ती त्यांतच मग्न असल्याचं तिने म्हटलं आहे.
श्रद्धा कपूर काय म्हणाली?
श्रद्धाने शेअर केलेला हा व्हिडीओ तिचा बॉयफ्रेंड राहुलने शूट केला असून तिने या व्हिडीओला “कोणीतरी असा शोधा जो तुमच्यातील असं रूप बाहेर आणू शकेल”. अशी कॅप्शन देत ती राहुलला डेट करत असल्याच्या अफवांना दुजोरा दिला आहे. राहुलबरोबर असताना श्रद्धा अनेकदा डान्स करत असते आणि ते व्हिडीओ ती पोस्ट करत असते.
श्रद्धाचा डान्स पाहून एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली ‘हृतिक रोशनच्या मावशीची मुलगी’ अशी कमेंट केली जिला तिने रिप्लायसुद्धा दिला आहे. अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. काहींनी तिला आधी घरातील पसारा आवर असंही सांगितलं आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार श्रद्धा व राहुल २०२२पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे जवळपास साडे तिन वर्षे एकमेकांबरोबर असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय दोघे अनेकदा एकत्र सार्वजनिक ठिकाणी स्पॉटही होत असतात. राहुल मोदीबद्दल बोलायचं झालं तर तोसुद्धा दिग्दर्शक असून अलीकडेच त्याने अभिनेत्री अनित पड्डाच्या जाहिरातीचं शूटिंग केलं होतं. जी श्रद्धाने इन्स्टाग्रामवर पोस्टही केली होती. शिवाय काही चित्रपटांसाठी त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामही केलं आहे.
