अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच निर्मात्यांनी अभिनेता रणदीप हुड्डा याचा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी निर्मात्यांनी एक नवं पोस्टर शेअर करत रणदीप हुड्डा साकारत असलेल्या मर्चंट या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली. पण त्याची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि त्याच्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जाणून घेऊ.
रणदीप हुडाची ‘ईठा’मध्ये काय भूमिका आहे
या बायोपिकमध्ये रणदीप अण्णा सावंत मर्चंट यांची भूमिका साकारत आहे. ते प्रसिद्ध तमाशा कलावंत विठाबाई यांचे पती होते. ‘ईठा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये रणदीप पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून मिशांना पीळ देताना दिसत आहे. तर पोस्टरवर त्याच्यामागे श्रद्धा कपूरचीदेखील झलक पाहायला मिळत आहे. हे पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी, ‘ईठाच्या मनावर राज्य करायला मर्चंट येत आहेत. ईठाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल’, असं कॅप्शन दिलं आहे. आता ‘ईठा’चा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून ती तमाशा कलावंत ईठाबाई यांच्या भूमिकेतून झळकणार आहे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पैलू, त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास, संघर्ष या गोष्टी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. श्रद्धा कपूर व रणदीप हुडासह या चित्रपटात मोहम्मद जीशान अय्यूब, अनंत जोशी, सिद्धार्थ जाधव, अक्षरा सिंह, उल्का गुप्ता आणि दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आता नुकातच निर्मात्यांनी ‘ईठ’चा ट्रेलही प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमधून श्रद्धा कपूर ईठाबाई यांच्या भूमिकेतून लक्ष वेधून घेत आहे. तिच्या तोंडी असलेले संवाद, तिचा लूक, नऊवारी साडी आणि मराठमोळा अंदाज यामुळे तिने लक्ष वेधलं आहे. तर दुसरीकडे रणदीप हुडाही ईठाबाईंच्या पतीच्या भूमिकेतून यामधून पाहायला मिळतोय. यामधून त्यांच्या नात्याची झलकही दिसत आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत.
दरम्यान, ‘ईठा’ या चित्रपटातून श्रद्धा कपूर व रणदीप हुडा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहणंही रंजक ठरेल. तसेच ‘स्त्री’नंतर ‘ईठा’ हा श्रद्धा कपूरच्या करिअरमधील अजून एक महत्त्वाचा चित्रपट मानला जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून आणि बॉक्स ऑफिसवर किती यश मिळतं हेही महत्त्वाचं ठरेल.
