scorecardresearch

Premium

IND vs AUS: सामन्यातील ‘त्या’ निर्णयानंतर श्रद्धा कपूरने उडवली थर्ड अंपायरची खिल्ली, बदाम ऑफर करत म्हणाली…

शुबमन गिलबद्दल थर्ड अंपायरने दिलेला निर्णय श्रद्धाला रुचला नाही, फोटो पोस्ट करत अंपायरची उडवली खिल्ली

shraddha kapoor
श्रद्धा कपूर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात शुबमन गिल आउट झाल्यानंतर बराच गोंधळ झाला. त्याची विकेट गेली तो चेंडू फिल्डरने कॅच पकडण्यापूर्वी थोडासा गवताला स्पर्श झाला होता. असं असतानाही थर्ड अंपायरने शुबमनला आउट घोषित केलं. यामुळे चाहते संतापल्याचं पाहायला मिळालं. तर, याच निर्णयावरून अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्टोरी पोस्ट करत अंपायरला टोला लगावला.

Video: “गमावलं ना मी तुला”! मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

tali fame actor suvrat joshi shared special post
“पाकिस्तानमधील प्रयोग, दहशतवादी हल्ला अन्…”, ‘ताली’ फेम सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…
IND vs NED: Why did Virat Kohli suddenly leave Team India? Will the match not be played against Netherlands
IND vs NED: अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा अन् विराट कोहली सराव सामना सोडून परतला घरी; टीम इंडियाची सोडली साथ? जाणून घ्या
Esha Gupta faced casting couch twice
“मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने…”, इशा गुप्ताने सांगितले कास्टिंग काउचचे धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दोघे जण…”
vicky kaushal
विकी कौशलने लहापणी खाल्लेला खिळा; डॉक्टर म्हणालेले जर “दोन दिवसात…”, अभिनेत्याने सांगितला किस्सा

इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धा कपूरने हातात काही बदाम घेतल्याचा फोटो पोस्ट केला. त्यात तिने थर्ड अंपायरला बदाम ऑफर केले आणि त्याने दिलेल्या निर्णयाबद्दल टोला लगावला. “मी थर्ड अंपायरला बदाम ऑफर करताना” असं कॅप्शन देत श्रद्धाने हा फोटो पोस्ट केला आहे.

shraddha kapoor
श्रद्धा कपूरची इन्स्टाग्राम स्टोरी

श्रद्धा कपूर क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. तिला क्रिकेटचे सामने पाहायला खूप आवडतं. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीतून तिचं क्रिकेटवर असलेलं प्रेम दिसून येतं. दरम्यान, श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या यशानंतर ती तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shraddha kapoor offered almond to third umpire india vs australia wtc final 2023 match hrc

First published on: 12-06-2023 at 12:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×