श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटगृहात गेला एक महिना हा सिनेमा टिकून आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३१ दिवस पूर्ण झाले आहेत. २०२४ या वर्षातील हा सर्वांत लोकप्रिय ठरलेला चित्रपट ठरला आहे.

‘स्त्री २’ची बॉक्स ऑफिसवर ५४७.९५ कोटींची कमाई

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर ५४७.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शनिवारी ‘स्त्री २’ने ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी ‘स्त्री २’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी बाय वन गेट वन (Buy One Get One) ही ऑफर दिली होती. त्याचा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. लवकरच हा चित्रपट ५५० कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण करील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 3 (1)
‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Thalapathy Vijay GOAT Box Office Collection
थलपती विजयच्या ‘GOAT’ने पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, ‘इतके’ कोटी कमावले
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Tumbbad re-release Box Office Day 1
पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘तुंबाड’ची दमदार कमाई, मराठीत का केला नव्हता चित्रपट? दिग्दर्शकाने सांगितलेलं कारण
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection
‘नवरा माझा नवसाचा २’ ची दमदार ओपनिंग, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

महत्त्वाचे म्हणजे ‘स्त्री २’ या चित्रपटाने १९ दिवसांत ५०८ कोटी रुपयांची कमाई करीत रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाला मागे टाकले होते. संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने ५०५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

तसेच, श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २‘ने बॉक्स ऑफिसवर ५११ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्य़ा एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली २ : द कनक्लुजन’ चित्रपटालाही मागे टाकले. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने ५२४.५३ कोटी रुपयांची कमाई केली होती; तर सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने ५२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या दोन मोठ्या चित्रपटांनादेखील ‘स्त्री २’ मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणते नवीन रेकॉर्ड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: ‘झोंबिवली’ ते ‘ट्रेन टू बुसान’, या वीकेंडला OTT वर पाहा झॉम्बीवर आधारित चित्रपट

‘स्त्री २’ हा चित्रपट अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला असून, श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव त्यात मुख्य भूमिकांत दिसत आहेत. त्याबरोबरच पंकज त्रिपाठी, तमन्ना भाटिया, वरुण धवन, अक्षय कुमार, अपारशक्ती खुराना हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत.

दरम्यान, या आठवड्यात करीना कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या सिनेमाची फार चांगली सुरुवात झाली नसल्याचे पाहायला मिळाले. आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.