scorecardresearch

Premium

“IPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पाऊस पडला”, अभिनेत्रीने शेअर केलं मीम, म्हणाली…

IPL फायनलचा ‘तो’ मीम श्रद्धा कपूरने केला शेअर

shraddha-kapoor-on-ipl-2023-meme
IPL फायनलचा मीम श्रद्धा कपूरने केला शेअर. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

IPL 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये आज(२९ मे) खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामातील हा अंतिम सामना रविवारी(२८ मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. आयपीएलचा अंतिम सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत.

आयपीएलच्या अंतिम सामन्याला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. श्रद्धामुळे पाऊल पडला आणि सामना रद्द झाला, अशा आशयाचे मीम्स व्हायरल झाले. “जिओ सिनेमाच्या प्री मॅच शोमध्ये श्रद्धा कपूर…नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाऊस पडण्याचं कारण…” असं एका मीममध्ये म्हटलं आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टावरुन हे मीम शेअर करत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. याबरोबरच तिने मीम शेअर करत “छम छम” हे तिचं गाणंही स्टोरीला दिलं आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?
shraddha-kapoor-meme

हेही वाचा>> Video : राखी सावंतचा अवतार पाहून सारा खान घाबरली, जोरात ओरडली अन्…; IIFA अवॉर्ड सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

“जिथे जाते तिथे पाऊस पडतो” आयपीएल फायनल रद्द झाल्यानंतर श्रद्धा कपूरवर मीम.

“ओह स्त्री कल मत आना”

हेही वाचा>> रुपाली चाकणकरांच्या लेकाच्या पहिल्या मराठी चित्रपटातील गाणं प्रदर्शित, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

“आजच्या मॅचमध्ये पाऊस पडण्याचं कारण श्रद्धा कपूर आहे”

हेही वाचा>> कुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली…

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रद्धाने रणबीर कपूरसह स्क्रीन शेअर केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shraddha kapoor reacted on ipl final gt vs csk cancel meme shared insta story kak

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×