scorecardresearch

Premium

Video: श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या कोण आहे तो?

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड आहे ‘या’ लोकप्रिय चित्रपटाचा लेखक

Shraddha Kapoor spotted with rumoured boyfriend Rahul Mody
Video: श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या कोण आहे तो? (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत असते. ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती पडली होती. नुकताच श्रद्धाचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे दोघं सोमवारी रात्री मुंबईतील जुहू पीव्हीआरच्या बाहेर एकत्र दिसले होते. पण श्रद्धाचा हा कथित बॉयफ्रेंड आहे तरी कोण जाणून घ्या.

हेही वाचा – कार्तिक आर्यनाच्या चाहत्यांसाठी खुशखबर! आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Pankaj Tripathi
“माफियाची भूमिका दिली, पण चित्रीकरणावेळी मला…”, पंकज त्रिपाठींनी सांगितला पदार्पणाचा किस्सा
adah-sharma
‘द व्हॅक्सिन वॉर’वर प्रतिक्रिया देण्यास अदा शर्माने दिला नकार; अभिनेत्रीने सांगितलं यामागील कारण
subodh bhave teen adkun sitaram
“दोन-अडीच तास…”, ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची प्रतिक्रिया
Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeekshaa Tawde
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम

श्रद्धा कपूर ही आपली पर्सनल लाइफ नेहमीच लाइमलाइटपासून दूर ठेवत असते. पण ३ जुलैला श्रद्धा राहुल मोदीबरोबर जुहू येथील चित्रपटगृहाबाहेर दिसली. आणि दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. माहितीनुसार, दोघं कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी चित्रपटगृहाबाहेर दोघं वेगवेगळ्या गाडीतून जाताना दिसले. याचा व्हिडीओ ‘टेक वन फिल्मी’ या ट्वीटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘किसी का भाई किसी की जान’च्या अपयशानंतर सलमान खाननं घेतला मोठा निर्णय; संजय लीला भन्साळींना फोन करत म्हणाला…

या व्हिडीओत श्रद्धा ही साध्या लूकमध्ये दिसली. तिने पांढऱ्या रंगाचा कॉटनचा ड्रेस घातला होता. तर राहुल राखाडी रंगाच्या शर्टमध्ये पाहायला मिळाला. राहुल मोदी हा ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाचा लेखक आहे. तसेच राहुलने ‘प्यार का पंचनामा २ ‘आणि ‘सोनू की टिटू की स्वीटी’ या चित्रपटासाठीही काम केलं आहे. दरम्यान, श्रद्धा आणि राहुलनं अद्याप आपल्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

हेही वाचा – Video: अभिनेते सयाजी शिंदेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “या पक्षाला….”

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचा ‘स्त्री २’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘धडकन २’, ‘चालबाज इन लंडन’ आणि ‘चंदा मामा दूर’ या चित्रपटातूनही श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shraddha kapoor spotted with rumoured boyfriend rahul mody video viral pps

First published on: 04-07-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×