Shraddha Murder Case Film: सध्या देशभरामध्ये चर्चा असलेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  श्रद्धा वालकर आणि तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाला यांच्यातील प्रेमकथा आणि त्याचा अत्यंत हिंसक पद्धतीने झालेला शेवट मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. मनिष सिंह या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> Shraddha Murder Case: “मला बेडवरुनही…”; श्रद्धाचे WhatsApp, Insta चॅट दिल्ली पोलिसांच्या हाती! पाहा Screenshot

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार श्रद्धा वालकर आणि आफताबच्या प्रेमप्रकरणावरील या चित्रपटाच्या स्क्रीन प्लेचं काम सुरु झालं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे वैवाहिक जीवनावर आधारित पण पत्नी-पत्नीमधील बिघडलेल्या संबंधांच्या आजूबाजूचे कथानक असणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला डार्लिंग्स चित्रपट चांगलाच चर्चेत होता. बदरु ही भूमिका आलियाने साकारली होती. तर विजय वर्माने हमजा ही भूमिका साकारलेली. घरात पत्नीविरोधात होणारी हिंसा हा या चित्रपटाचा गाभा होता. या चित्रपटामध्ये शैफाली शाह यांनीही आलियाची आई शामसूची भूमिका साकारली होती. पत्नीबरोबरच्या या त्रासदायक नात्यातून बदरु आणि तिची आई कसे बाहेर पडतात याबद्दलची ही रंकज गोष्ट होती.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताब सिरीयल किलर? ड्रग्जच्या व्यवसायातही सहभाग? त्याच्या ओळखीतील मुलींचा शोध सुरु

वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिल्याची घटना आठवडाभरापूर्वी समोर आली. हा निर्मम गुन्हा सहा महिन्यांनंतर उघडकीस आला आहे. श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित तरुणीच्या शरीराचे काही तुकडे दिल्ली पोलिसांना सापडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असतानाच दिग्दर्शक आणि निर्माते मनिष सिंह यांनी एक पत्रक जारी करत या कथानकावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान

या चित्रपटाची तयारी सुरु असल्याचं सिंह यांनी गुरुवारी जारी केलेल्या एका पत्रकार म्हटलं आहे. सिंह यांनी सध्या त्यांच्या अन्य एका प्रोजेक्टचं काम हाती घेतलं आहे. ‘लाइव्ह इन बॉयफ्रेण्ड’ च्या स्क्रीप्टचं काम सुरु झालं आहे. हा चित्रपटाचं कनाथक ‘लव्ह-जिहाद’च्या संकल्पनेवर आधारित असेल असं सांगण्यात आलं आहे. साध्या मुलींना कशाप्रकारे फसवलं जात आणि जाळ्यात ओढलं जातं याबद्दलची ही कथा असेल. वृंदावन फिल्मसच्या बॅनरखाली सिंह या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

श्रद्धा आणि आफताबच्या प्रेमप्रकरणावर आधारित चित्रपटाचं प्राथमिक नावही निश्चित झालं आहे. ‘हू किल्ड श्रद्धा वालकर’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटाच्या कथेसंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम सुरु झालं आहे. सिंह यांच्या टीमकडून दिल्लीच्या आजूबाजूच्या जंगलांमधून व्हिडीओ क्लिप शूट केल्या जात आहे. या चित्रपटाचं शुटींग कुठे कारायचं यासंदर्भातील लोकेशन शोधम्याचं कामही सुरु आहे. या प्रकरणामध्ये दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करत नाही तोपर्यंत चित्रपटाची पटकथा निश्चित केली जाणार नाही असंही निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha walker aftab ameen poonawalla doomed love story to come to life on the big screen scsg
First published on: 19-11-2022 at 16:21 IST