मराठी चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रेयसनं बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जवळपास दीड दशकाच्या त्याच्या अभिनय कारकिर्दीत त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच श्रेयसने पुन्हा छोट्या पडद्यावरही पदार्पण करत कित्येक चाहत्यांना खुश केलं. मध्यंतरी ‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनला आवाज दिल्याने त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. आता पुन्हा श्रेयस चर्चेत आहे, पण एका वेगळ्याच कारणासाठी.

नुकतंच श्रेयस तळपदेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक जाहीर माफी मागणारी पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर श्रेयस तळपदेच्या ‘कमाल धमाल मालामाल’ या २०१२ च्या चित्रपटातील एक सीन प्रचंड व्हायरल होत आहे, आणि या सीनमुळेच श्रेयसला माफी मागावी लागली आहे. आपल्या पोस्टमध्ये तो सीनसुद्धा श्रेयसने जोडला आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

आणखी वाचा : आमिर खानच्या लेकीला आली होणाऱ्या सासूबाईंची आठवण; आयरा खानची होणाऱ्या नवऱ्यासह खास पोस्ट चर्चेत

एवढ्या वर्षांनी वाद का?

‘कमाल धमाल मालामाल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. या चित्रपटात श्रेयससह नाना पाटेकर, ओम पुरी, परेश रावल यांच्यासारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील एका सीनमध्ये श्रेयस एका टेम्पोला थांबताना दिसत आहे, हा एक अॅक्शन सीन आहे. तो टेम्पो थांबवताना श्रेयस त्याच्या पुढच्या भागावर लाथ मारताना दिसतो. श्रेयस जिथे लाथ मारत आहे त्या ठिकाणी गाडीवर आपल्याला ओम (ॐ) पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मात ओमला खूप जास्त महत्त्व आहे. हा सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, आणि या चित्रपटावर आणि श्रेयस तळपदेवर टीका होत आहे. याच टिकेवर श्रेयसने अत्यंत नम्रपणे उत्तर देत प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

काय म्हणाला श्रेयस?

श्रेयस ट्वीटमध्ये म्हणतो, “चित्रपटाचं शूटिंग करतेवेळी वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. या चित्रीकरणादरम्यान एखाद्याची मानसिकता, दिग्दर्शकाची मागणी, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. याचा अर्थ जे तुम्ही पाहताय त्याचं मी स्पष्टीकरण देतोय असं अजिबात नाही. त्या सीन मध्ये जे झालं ते अनावधानाने झालं आणि मी त्याबद्दल माफी मागतो. मी ही गोष्ट माझ्या दिग्दर्शकाच्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. असो पण यापुढे मी पुन्हा अशी कोणतीही कृती करणार नाही ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील.”

श्रेयसने दिलेल्या या उत्तराचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुकही होत आहे. अत्यंत नम्रपणे चूक कबूल केल्याने नेटकऱ्यांनीही त्याची ही माफी कबूल केली आहे. श्रेयसच्या अभिनयाला पसंती मिळतेच पण आता या ट्वीटमुळे त्याची अधिक चर्चा होत आहे.