scorecardresearch

“मी शाहरुख खानला friendzone…” श्रिया पिळगांवकरने सांगितली तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची आठवण

‘मिर्जापुर’ या वेबसीरिजमधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली

“मी शाहरुख खानला friendzone…” श्रिया पिळगांवकरने सांगितली तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची आठवण
श्रिया पिळगांवकर (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकरसुद्धा एक नावाजलेली अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. शिवाय ‘मिर्जापुर’ या वेबसीरिजमधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. श्रियाने या क्षेत्रात किंग खान शाहरुख खानच्या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यादरम्यानच्या अनुभवाबद्दल श्रियाने खुलासा केला आहे.

‘फिल्म कम्पॅनियन’बरोबर संवाद साधताना श्रियाने तिच्या ‘फॅन’ चित्रपटादरम्यानच्या आठवणी शेअर केल्या आहेत. याविषयी श्रिया म्हणाली, “पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानच्या लव्ह इंट्रेस्टची भूमिका मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अर्थात चित्रपटात मी शाहरुखला एक (Friendzoned) मित्र म्हणूनच वागणूक दिली याची मला खूप खंत वाटते. आमच्या प्रयत्नांची दखल लोकांनी घेतली पण यश राजच्या इतर चित्रपटांप्रमाणे व्यवसाय करण्यात हा चित्रपट तितका सफल झाला नाही.”

आणखी वाचा : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटात दाक्षिणात्य स्टार पृथ्वीराजची एन्ट्री; दिसणार नकारात्मक भूमिकेत

‘फॅन’ बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर चित्रपटाच्या ऑफर हातातून निसटल्याचंसुद्धा श्रियाने स्पष्ट केलं. शिवाय चित्रपटात काम करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या तिच्याकडे नव्हत्या असंही श्रियाने स्पष्ट केलं आहे. यादरम्यान श्रियाला तिचे आई वडील यांनी एक शिकवण दिली त्याबद्दल सांगताना श्रिया म्हणाली, “चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यांनी माझी समजूत काढली आणि चित्रपट व्यवसाय हा असाच आहे हेसुद्धा सांगितलं. आपण आपल्याकडून २००% मेहनत घेऊनही अपयश हाती लागतं हा निसर्गाचा नियम आहे असंही त्यांनी मला सांगितलं.”

२०२२ मध्ये श्रिया ‘झी ५’च्या ‘ब्रोकन न्यूज’ या वेबसिरिजमध्ये आणि प्राइम व्हिडीओच्या ‘गिल्टी माइंड्स’ या सिरिजमध्ये झळकली. यातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली. ‘मिर्जापुर’च्या पहिल्या सीझनमध्येच तिच्या पात्राचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी पुन्हा तिला त्या सिरिजमध्ये आणण्यासाठी विनंती केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 14:03 IST

संबंधित बातम्या