सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्...; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली... | shruti haasan simple pic and suffer from fever look viral on social media | Loksatta

सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…

श्रुती हसनने आजारपणाती काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…
श्रुती हसनने आजारपणाती काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांची लेक श्रुती हसनही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मध्यंतरी श्रुतीने तिच्या नाकाची सर्जरी केली असल्याचा खुलासा केला होता. “मी माझ्या नाकाची सर्जरी केली आहे. माझ्या नाकाला दुखापत झाल्यामुळे मी सर्जरी केली.” असं श्रुतीने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं. आता श्रुतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा विचित्र लूक समोर आला आहे.

आणखी वाचा – “लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या…” मुलाच्या लग्नावरून शरद पोक्षेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला

श्रृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रुतीचा एक वेगळाच लूक दिसून येत आहे. एका फोटोमध्ये श्रुती अगदी सुंदर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा आजारपणातील फोटो दिसत आहे.

श्रुतीने हे फोटो शेअर करताना म्हटलं की, “परफेक्ट पोस्ट व सेल्फीच्या जगात माझे काही लूक फायनल होऊ शकले नाहीत. खराब केसांचा दिवस, ताप, सायनसमुळे सुजलेला चेहरा व मासिक पाळीचा त्रास आणि आराम. तुम्हाला माझा हा देखील लूक आवडेल अशी आशा आहे.”

आणखी वाचा – मराठमोळ्या सासूबाईंबरोबर बेभान होऊन नाचली आमिर खानची लेक, अभिनेत्याच्या एक्स पत्नीनेही धरला ठेका अन्…

श्रुतीचा हा लूक पाहून चाहत्यांनी तिचं कौतुकच केलं आहे. खरा चेहरा, अगदी सुंदर, या लूकमध्येही छान दिसते अशा अनेक कमेंट तिचे फोटो पाहून चाहत्यांनी केल्या आहेत. सध्या तापामुळे तसेच मासिक पाळीच्या त्रासामुळे श्रुती हैराण झाली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 20:25 IST
Next Story
अरबाज खानचं गर्लफ्रेंडशी ब्रेकअप? जॉर्जिया एंड्रियानीच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; म्हणाली, “आमचं नातं….”