scorecardresearch

Premium

शुभमन-साराचा ब्रेकअप? इन्स्टाग्रावर केले अनफॉलो; गिलचा ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

shubman gill and sara ali khan
इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे शुभमन गिल आणि सारा यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या त्याच्या IPL 2023 मधील कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या गिलने देशभरातील लोकांची मने जिंकली आहे. क्रिकेटबरोबर शुभमनचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

हेही वाचा : आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्या पत्नीने दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “माझी फसवणूक…”

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर शुभमन गिल आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. दोघांच्या एकत्र डिनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर पापाराझींना शुभमन-सारा एकत्र विमानतळावर दिसले होते, परंतु आता इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवरील नावात केला मोठा बदल…जाणून घ्या कारण

शुभमन गिल आणि सारा अली खान यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप दोघांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दमदार फॉर्मात असलेल्या शुभमनने साराला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि शुभमनचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

हेही वाचा : आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मराठी ऐकलंत का? ‘पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम पाहून नेटकरी म्हणतात “किरण मॅडम…”

शुभमन-साराने वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांच्या नात्याचे संकेत दिले होते. शुभमनने पंजाबी चॅट शो ‘दिल दिया गल्लान’ मध्ये सर्वात आवडती बॉलीवूड अभिनेत्री म्हणून सारा अली खानचे नाव घेतले होते. त्यानंतर त्याला साराला डेट करीत आहेस का असे विचारल्यावर त्याने “कदाचित हो कदाचित नाही” असे उत्तर दिल्यामुळे दोघे एकमेकांना डेट करीत असलेल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शुबमन गिलचे हे वक्तव्य ऐकून मुलाखतकार पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाही थक्क झाली आणि तिने पंजाबीमध्ये ‘सारा दा सारा सच बोलो प्लीज’ अशी त्याची खिल्ली उडवली होती.

शुभमन गिल आणि सारा अली खानने केव्हाच उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. दुसरीकडे काही लोकांनी शुभमन गिलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरबरोबरही जोडले आहे. मात्र , याबाबतही अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shubman gill and sara ali khan unfollow each other on social media sva 00

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×