लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी व राजा चौधरीची मुलगी पलक तिवारी आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात आली आहे. ती तिच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या पलक व सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. हे दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. त्यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच पलकचे वडील राजा चौधरीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्वरा भास्करने भगव्या बोल्ड ड्रेसमध्ये केलं मॅटर्निटी फोटोशूट; नेटकरी म्हणाले, “अंधभक्तांचा किती अपमान…”

राजा चौधरीने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मुलगी पलक तिवारीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. “पलक मोठी झाली आहे. ती आता लहान बाळ राहिली नाही. ती तिच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ती तिच्या कामात खूप व्यग्र असते. तिचा दिनक्रम ठरला आहे. आम्हाला भेटायला वेळ मिळत नाही. एकत्र राहत नसल्याने प्लॅन करून भेटावं लागतं, पण जेव्हा तिला वेळ असतो तेव्हा ती मला भेटते,” असं राजा चौधऱी म्हणाला.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

“भेट झाली नाही तर पलक आणि मी फोनवर बोलतो. मी तिला सोशल मीडियावर बघत असतो. ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि तिला मी १० पैकी १० गुण देतो. पलक जे काम करते, त्यासाठी खूप मेहनत घेते,” असं मत राजा चौधरीने व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलक इब्राहिमला डेट करत असल्याच्या वृत्तावर राजा चौधरीने प्रतिक्रिया दिली. यावर आपला कोणताही आक्षेप नसल्याचं तो म्हणाला. “मीही या वयात होतो आणि या गोष्टी जगलो आहे. ही अशी वेळ असते जेव्हा मुलं स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. मी खूश आहे. पलकच्या कोणत्याही निर्णयात मी तिच्याबरोबर असेन,” असं राजाने सांगितलं. इतकंच नाही तर त्याने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी व पलकची आई श्वेता तिवारीचंही कौतुक केलं.