हिंदी मनोरंजनसृष्टीतील नेहमी चर्चेत असणारी आई-मुलीच्या जोड्यांपैकी एक म्हणजे श्वेता तिवारी आणि पलक तिवारी. अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं. ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. तिने तिची आई श्वेता तिवारीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. पलकने नुकतीच 'ई टाइम्स'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. पलकच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये श्वेता तिच्याशी खूप कठोर वागत होती. इतकंच नाही तर त्या दिवसांमध्ये श्वेताचा लेकीवर अजिबात विश्वास नव्हता. पण पलकने तिच्या वागण्याने आईचा पूर्ण विश्वास संपादन केला. पलकने बॉलीवूडमध्ये करिअर करायला सुरुवात करण्याच्या आधी श्वेताने तिला एक ताकीद दिली होती, असा खुलासा पलकने केला आहे. आणखी वाचा : “ती अनेकदा माझे फोनही उचलत नाही…” पलक तिवारीचा आई श्वेता तिवारीबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, “मी सलमान खानच्या…” पलक म्हणाली, "मी एक आदर्श मुलगी नाही, असं मला वाटायचं. पण मी वाईट मुलगीही नाही आणि आईलाही हे माहीत होतं. या विचारांची मला खूप मदत झाली. 'दिल्ली टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तिने मला एक सक्त ताकीद दिली होती. तिने मला सांगितलं होतं की, माझं नाक कापू नकोस, माझी इमेज खराब करू नकोस. मी काहीही केलं की ती मला, हे काय करते आहेस? असं नेहमी विचारते. हेही वाचा : “माझी आई म्हणजे ‘देसी आंटी’…,” श्वेता तिवारीबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा, म्हणाली, “२० रुपयेही खर्च करण्यासाठी…” पलकचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. याआधीही एकदा पलकने एका मुलाखतीत तिची आई खूप कडक असल्याचं सांगत काहीही करण्याच्या आधी तिला श्वेताची परवानगी घ्यावी लागते असं म्हटलं होतं.