scorecardresearch

‘शेरशाह’च्या सेटवर नाही तर ‘या’ कारणाने झाली होती सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट, नंतर ‘अशी’ सुरु झाली लव्हस्टोरी

दोघांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली असं बोललं जात होतं. मात्र त्यांची लव्हस्टोरी वेगळीच आहे.

kiara sid
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

गेली अनेक दिवस सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. अखेर ही दोघं उद्या म्हणजेच ६ फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली असं बोललं जात होतं. मात्र त्यांची लव्हस्टोरी वेगळीच आहे.

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले. आजपासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. अशातच त्यांची पहिली भेट नक्की कशी झाली होती हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

आणखी वाचा : याला म्हणतात स्वॅग! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’ भारतीय अभिनेता

‘शेरशाह’च्या बरंच आधीपासून ते एकमेकांना ओळखत होते. या दोघांची भेट तेव्हा झाली होती जेव्हा सिद्धार्थ मल्होत्रा आघाडीचा अभिनेता बनला होता तर कियारा करिअरसाठी संघर्ष करत होती. कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये कियाराने सांगितले की, ती सिद्धार्थ मल्होत्राला ‘शेरशाह’च्या बरंच आधीपासून ओळखत होती. कियाराच्या ‘लस्ट स्टोरीज’च्या रॅप-अप पार्टीमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती आणि तेथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षांनी सिद्धार्थ आणि कियारा ‘शेरशहा’ चित्रपटात एकत्र झळकले. दोघेही आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र होते. तर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली.

रिपोर्ट्सनुसार, २०२१ मध्ये या दोघांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कियाराच्या आई-वडिलांनी सिद्धार्थच्या घरच्यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले होते. तेव्हा सिद्धार्थ आणखी यारा एकमेकांच्या घरच्यांना भेटले. त्यांच्या घरच्यांनानीही या लग्नाला आनंदाने संमती दिली आणि उद्या ही दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराचा मेहंदी सोहळा संपन्न? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स नाही आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन यांबरोबरच अनेक आघाडीचे कलाकार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 12:30 IST