सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाह सोहळ्याचा थाटच भारी; सूर्यगढ पॅलेसमधील खोलीचं एका दिवसाचं भाडं तब्बल... | siddharth malhotra and kiara advani spent crore of rupees for their wedding destination | Loksatta

सिद्धार्थ-कियाराच्या शाही विवाह सोहळ्याचा थाटच भारी; सूर्यगढ पॅलेसमधील खोलीचं एका दिवसाचं भाडं तब्बल…

या पॅलेसमध्ये लग्न करण्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीयांनी कोट्यवधींचा खर्च केला आहे.

sid kiara wedding destination

बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाह बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांची लगीन घाटिका समीप आली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत. आता अशातच त्यांनी लग्नासाठी बुक केलेल्या सूर्यगढ पॅलेसचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या पॅलेसचं एका दिवसाचं भाडं किती हेही समोर आलं आहे.

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय जैसलमेरला रवाना झाले. आजपासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नामुळे सूर्यगढ पॅलेस सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. हा पॅलेस आणि या पॅलेसमध्ये आकारण्यात येणारं भाडं चर्चेत आलं आहे. या पॅलेसमध्ये लग्न करण्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीयांनी कोट्यवधींचा खर्च केला आहे.

आणखी वाचा : लगीन घटिका समीप आली! ‘असा’ आहे सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाट, विवाहस्थळाचे Inside Videos व्हायरल

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबरच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. या सर्व पाहुण्यांसाठी या आलिशान पॅलेसमध्ये एकूण ८४ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पार्किंगची ही चांगलीच सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय सर्व पाहुण्यांच्या सुरक्षिततेचाही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

हा पॅलेस जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर आहे. याचा एकूण परिसर ६५ एकर आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्स पैकी एक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आकारण्यात येणारं भाडंही तितकंच मोठं आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्याचं असल्यास १ कोटी २० लाख रुपये भाडं करण्यात येतं. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्या दरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. या पॅलेस मध्ये २५० स्क्वेअर फुट रूममध्ये एका दिवसासाठी राहायचं असल्यास २० ते ३० हजार रुपये भाडं आकारण्यात येतं. तर या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडं आकारण्यात येतं. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी या पॅलेसमध्ये विविध प्रकारच्या रूम्स बुक केल्या गेल्या आहेत.

हेही वाचा : ६ फेब्रुवारी नाही तर ‘या’ दिवशी सिद्धार्थ-कियारा बोहल्यावर चढणार, लग्नाबाबत समोर आली मोठी अपडेट

सिद्धार्थ आणि किवाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आस्वाद घेता यावा यासाठी राजस्थान नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 18:18 IST
Next Story
७५ महिलांना अंगद बेदीने केलंय डेट; नोरा फतेहीबरोबर होतं अफेअर, पण नेहा धुपिया गरोदर राहिली अन्…