Siddharth malhotra revealed about his previous relationship experience rnv 99 | "आधीच्या रिलेशनशिपमधून मी एक महत्वाची गोष्ट शिकलो की..." सिद्धार्थ मल्होत्राने केला मोठा खुलासा | Loksatta

“आधीच्या रिलेशनशिपमधून मी एक महत्वाची गोष्ट शिकलो की…” सिद्धार्थ मल्होत्राने केला मोठा खुलासा

तो लवकरच कियारा अडवाणीशी विवाहबद्ध होणार आहे. तर दुसरीकडे, त्याची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टबद्दलही काही गोष्टी समोर येत आहेत.

sid alia

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या चर्चेत आहे. एकीकडे त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. तो लवकरच कियारा अडवाणीशी विवाहबद्ध होणार आहे. तर दुसरीकडे, त्याची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टबद्दलही काही गोष्टी समोर येत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल काही गोष्टी उघड केल्या आहेत. तसेच आधीच्या रिलेशनशिपमधून तो काय शिकला याचाही त्याने खुलासा केला आहे.

हेही वाचा : गौरी खान करणार जॅकलिन फर्नांडिसच्या घराचे इंटिरियर, नेटकरी म्हणाले, “हे पैसेही सुकेशने…”

अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. आलिया आणि सिद्धार्थ यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (२०१२) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात वरुण धवनही होता. शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे म्हटले जाते. तेव्हापासून ते दोघे ‘कपूर अँड सन्स’ (२०१६) पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.

त्याने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ शोमध्ये त्याला त्याच्या मांजरीची खूप आठवण येते, असे त्यानर सांगितले होते. त्या मांजरीचे नाव आहे एडवर्ड. आलियाकडेही एक मांजर आहे, तिचेही नाव एडवर्ड आहे. त्यामुळे आलियाकडे असलेली मांजर तिला सिद्धार्थने भेट म्हणून दिली होती हे त्याने स्पष्ट केलं. त्यानंतर आता त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा आलिया भट्टचे मांजर एडवर्डचा उल्लेख केला आहे.

सिद्धार्थने बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. त्यात रॅपिड फायर राऊंडमध्ये त्याला विचारण्यात आले की, “त्याच्या पूर्वीच्या रिलेशनशिपमधून तो कोणत्या गोष्टी शिकला?” तेव्हा उत्तर देताना तो म्हणाला, “मला वाटते मी माझ्या पूर्वीच्या रिलेशनशिपमधून हे शिकलो आहे की, भेटवस्तू म्हणून पाळीव प्राणी कधीही देऊ नका.” तसेच त्याला आलिया भट्टकडून कोणती गोष्ट चोरायची आहे असे विचारले असता तो म्हणाला, “तिचे मांजर… एडवर्ड.”

आणखी वाचा : सिद्धार्थ मल्होत्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा माझा…”

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ब्रेकाअपनंतर आपापले मार्ग पूर्णपणे वेगळे केले. ‘कपूर अँड सन्स’नंतर त्यांनी कधीच एकत्र स्क्रीन शेअर केला नाही. आता आलिया भट्टने रणबीर कपूरशी लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राही अभिनेत्री कियारा अडवाणीला काही महिन्यांपासून डेट करत आहे. पुढील वर्षी सिद्धार्थ आणि कियारा बोहल्यावर चढणार असल्याचे म्हटले जाते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-10-2022 at 13:25 IST
Next Story
आधी नाना पाटेकरांच्या पाया पडला अन् नंतर…, रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल