scorecardresearch

“तुझ्यासाठी…” आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त एक्स बॉयफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत

त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

alia bhatt
आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज आलिया तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. नुकतंच तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक्स बॉयफ्रेंडने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “तो पैशांसाठी गेला…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाने ओंकार भोजनेच्या एक्झिटवर मांडलेले मत

सिद्धार्थने आलियाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे त्यात त्याने आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. “आलिया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. येणारे वर्ष तुझ्यासाठी फारच खास असू दे. खूप खूप प्रेम”, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

आणखी वाचा : “कार्तिकी गायकवाडमुळेच…” मुलाखतीदरम्यान आर्या आंबेकर स्पष्टच बोलली

दरम्यान सिद्धार्थने दिलेल्या या शुभेच्छांमुळे तो चर्चेत आला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच सिद्धार्थ मल्होत्राने अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबर लग्नगाठ बांधली. त्या दोघांचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडला होता. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांचे अनेक फोटोही समोर आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 19:47 IST
ताज्या बातम्या